कार मालकास ७.५० हजार देण्याचे न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:10 PM2019-09-14T13:10:13+5:302019-09-14T13:10:55+5:30
वैभववाडी : पणजी-पुणे निमआराम बस आणि कारच्या अपघातात जखमी झालेल्या कारमधील व्यक्तींना नुकसान भरपाई म्हणून साडेसात हजार रुपये देण्याचा ...
वैभववाडी : पणजी-पुणे निमआराम बस आणि कारच्या अपघातात जखमी झालेल्या कारमधील व्यक्तींना नुकसान भरपाई म्हणून साडेसात हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. २०१७ मध्ये वैभववाडी-तळेरे मार्गावर कोकिसरे घंगाळे येथे निमआराम बस आणि कारमध्ये जोरदार धडक झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोकिसरे घंगाळेवाडी येथे पणजी-पुणे निमआराम बसची ट्रकला ह्यओव्हरटेकह्ण करीत असताना समोरून आलेल्या कारला धडक बसली होती. यांसदर्भात वैभववाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राजू जामसंडेकर यांनी केला होता. या प्रकरणी वैभववाडी न्यायालयाचे न्यायधीश एस. ए. जमादार यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने पुणे-पणजी निमआराम बसचे चालक रघुनाथ सुतार यांना अपघातप्रकरणी दोषी ठरवित त्यांना दंड म्हणून कारमधील जखमीला भरपाई म्हणून जखमी झालेल्या कारमधील व्यक्तीस साडेसात हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
या गुन्ह्याचा तपासदेखील पोलीस हवालदार जामसंडेकर यांनी केला होता. हवालदार जामसंडेकर यांनी तपास केलेल्या अपघाताच्या आणखी एका प्रकरणी गेल्याच आठवड्यात आणखी एका चालकास न्यायालयाने साडेपाच महिन्यांचा कारावास आणि एक हजार चारशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे जामसंडेकर यांचे अभिनंदन केले जात आहे.