वायंगणी किनाऱ्यावर सिलींडर आढळला, मच्छिमार वस्तीत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 04:49 PM2020-06-20T16:49:46+5:302020-06-20T16:51:15+5:30
वायंगणी समुद्र किनाऱ्यावर विदेशी बनावटीचा एक सिलींडर आढळल्याने येथील मच्छिमार वस्तीत एकच खळबळ उडाली. मात्र वेंगुर्ला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन सदर विदेशी बनावटीचा सिलींडर ताब्यात घेत हा रिकामी असल्याची माहिती मच्छिमारांना दिली.
वेंगुर्ला : वायंगणी समुद्र किनाऱ्यावर विदेशी बनावटीचा एक सिलींडर आढळल्याने येथील मच्छिमार वस्तीत एकच खळबळ उडाली. मात्र वेंगुर्ला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन सदर विदेशी बनावटीचा सिलींडर ताब्यात घेत हा रिकामी असल्याची माहिती मच्छिमारांना दिली.
सध्या समुद्राला उधाण असल्याने समुद्रातील काही वस्तू उधाणामुळे किनाऱ्यांवर येऊन पडत आहेत. त्यातूनच विदेशी जहाजावरील वापरण्यात येणारे रिकामा सिलींडर समुद्रात फेकल्यानंतर तो गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वायंगणी किनारी मच्छिमार घनश्याम तोरस्कर यांना आढळून आला.
सागर रक्षक सुहास तोरस्कर यांना माहिती दिल्यानंतर वेंगुर्ला पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर काही वेळातच पोलीस तेथे दाखल झाले.
सिलींडर रिकामी
घटनास्थळी वेंगुर्ले पोलीस स्थानकाचे निरीक्षक तानाजी मोरे ,पोलीस कॉन्स्टेबल कांडर, पाटील, धुरी, सावंत यांनी घटनास्थळी येऊन सिलींडर ताब्यात घेतला. हा सिलींडर रिकामी असल्याची माहिती पोलिसांनी मच्छिमारांना दिली.