कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपाचे ट्रॅक्टर रॅलीतून कणकवलीत शक्तिप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 06:22 PM2021-01-07T18:22:04+5:302021-01-07T18:24:16+5:30
BJP Rally Kankavli sindhudurg- मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कणकवली येथे गुरुवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढून भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण आदी नेते ट्रॅक्टरमध्ये बसले होते. तर आमदार नितेश राणे हे स्वतः ट्रॅक्टर चालवत असल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली.
कणकवली : मोदी सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ कणकवली येथे गुरुवारी शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढून भाजपाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण आदी नेते ट्रॅक्टरमध्ये बसले होते. तर आमदार नितेश राणे हे स्वतः ट्रॅक्टर चालवत असल्याने ही रॅली लक्षवेधी ठरली.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या कृषी विधेयकांच्या समर्थनासाठी भाजपाच्यावतीने कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या ट्रॅक्टर रॅलीत बैलगाड्या घेऊन काही शेतकरी सहभागी झाले होते .
ट्रॅक्टर तसेच बैलगाड्या सुशोभित करण्यात आल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. तर डोक्याला भगवे फेटे बांधून कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभागही लक्षणीय होता.
सकाळी ११ .३० वाजता मुडेडोंगरी मैदान येथून सुरू झालेली ट्रॅक्टर रॅली भाजपा कार्यालयाजवळील जाहीर सभेच्या ठिकाणी पोहचली. यावेळी माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर,जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक,माजी आमदार ऍड. अजित गोगटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, संजना सावंत,दिपलक्ष्मी पडते, प्रभाकर सावंत, राजू राऊळ, राजन चिके, जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, महेश गुरव,नगराध्यक्ष समीर नलावडे, सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब, सावी लोके,सोनू सावंत, प्रियांका साळसकर,राजश्री धुमाळे,मेघा गागंण, सुप्रिया नलावडे,कविता राणे,प्रतिक्षा सावंत,रवींद्र शेट्ये,मनोज रावराणे,बंड्या मांजरेकर, नासिर काझी ,अण्णा कोदे , बबलू सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.