सुधीर राणेकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांचे संसार पुन्हा सावरण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत. अतिवृष्टी, अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जाणे हे संवेदनशील व उत्तम नागरिकांचे द्योतक आहे; परंतु सद्यस्थिती पाहता अचानक नैसर्गिक आपत्ती आल्यास खूप मोठे नुकसान होऊ नये यासाठी अगोदरच आपत्ती व्यवस्थापन तसेच वैशिष्ठयपूर्ण असे नियोजन करणे ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे.एखादी आपत्ती आली तर त्यातून वाचण्यासाठी तत्कालीक उपाययोजना केल्या जातात. पण, तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे मोठया नुकसानीला सामोरे जावे लागते . वेळप्रसंगी काही जणांना आपला जीव गमवावा लागतो. हे नुकसान कधीही भरून येणारे नसते. त्यामुळे भविष्यात दुर्दैवी घटना घडण्याअगोदरच त्या होऊ नयेत, यासाठी शासनाने उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे.देशातील व राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड करणे, जास्तीत जास्त संभाव्य पूररेषा निश्चित करून तेथील नागरिकांचे स्थलांतर करणे, धोकादायक संभाव्य पूररेषेच्या जवळपास संरक्षक भिंत उभारणे, नदीजोड झाल्यावर प्रमुख धरणांतील पाणी विसर्ग व व्यवस्थापन यासाठी केंद्रीय स्तरावर मुख्य समिती व त्याअंतर्गत राज्य पातळीवरील, जिल्हा व तालुकास्तरावर समिती असावी. त्यांच्यामार्फत पाणी व्यवस्थापन, धरण सुरक्षितता, धरणगळती झाल्यानंतरही पुढे मोठा धोका होऊ नये म्हणून संरक्षक भिंत बांधणे, धरणातील पाणीगळती, संभाव्य धोक्यांबाबत व्यवस्थापन असावे. दुर्दैवाने अशा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्या तरी त्यांचा सामना करण्यासाठी शासकीय व्यवस्था व नागरिकांना योग्य ते प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.एखाद्या इमारतीला अचानक आग लागली तर त्यापासून बचाव कसा करायचा ? त्यासाठी कोणती काळजी घ्यायची ? इमारती मध्ये जास्त माणसे असतील तर त्यांना सुखरूप बाहेर कसे काढायचे ? त्या व्यक्तींनी घाबरून न जाता कोणती खबरदारी घ्यावी? चेंगराचेंगरी होणार नाही यासाठी काय उपाययोजना कराव्यात ? याबाबतचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण नागरिकांना अगोदरच देणे आवश्यक आहे. याप्रमाणे सर्व नागरिकांना प्रशिक्षित केल्यास अनेक समस्यांचा सामना करणे सहज शक्य होईल.भविष्यात उद्भवणाऱ्या आपत्तींचा व त्यानंतर निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांचा अभ्यास व व्यवस्थापन करणारी स्वतंत्र यंत्रणा ही केवळ कागदोपत्री नव्हे, तर सर्वप्रकारे उत्तमरीत्या प्रशिक्षित असणारी यंत्रणा-शासकीय, सांघिक, सामाजिक संस्था व वैयक्तिक पातळीवरही असणे हे क्रमप्राप्तच आहे, किंबहुना आता ही काळाची "गरजच' बनली आहे.सामाजिक संघटनांचे सहकार्य महत्वाचे !आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नागरिकांना शासन देत असताना समाजातील विविध सामाजिक संघटनांना सहकार्याचे आवाहन केल्यास ते महत्वपूर्ण ठरणार आहे. याकामासाठी सांघिक प्रयत्न झाल्यास निश्चितच यश मिळेल.
आपत्ती व्यवस्थापन ही आजच्या काळाची गरज !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 2:00 PM
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांचे संसार पुन्हा सावरण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत. अतिवृष्टी, अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धावून जाणे हे संवेदनशील व उत्तम नागरिकांचे द्योतक आहे; परंतु सद्यस्थिती पाहता अचानक नैसर्गिक आपत्ती आल्यास खूप मोठे नुकसान होऊ नये यासाठी अगोदरच आपत्ती व्यवस्थापन तसेच वैशिष्ठयपूर्ण असे नियोजन करणे ही सध्याच्या काळाची गरज बनली आहे.
ठळक मुद्देआपत्ती व्यवस्थापन ही आजच्या काळाची गरज !सामाजिक संघटनांचे सहकार्य महत्वाचे !