कलमठातील युवकाकडून युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:01 PM2020-01-07T12:01:41+5:302020-01-07T12:02:40+5:30
कणकवली तालुक्यातील एका युवतीच्या विनयभंगाची घटना २ जानेवारी रोजी घडली आहे. पीडित युवतीचा गैरफायदा घेऊन संशयित आरोपी अमोल साटम (रा. कलमठ-बिडयेवाडी) याने एकदंत अपार्टमेंटमध्ये अतिप्रसंग करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात विविध कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कणकवली : कणकवली तालुक्यातील एका युवतीच्या विनयभंगाची घटना २ जानेवारी रोजी घडली आहे. पीडित युवतीचा गैरफायदा घेऊन संशयित आरोपी अमोल साटम (रा. कलमठ-बिडयेवाडी) याने एकदंत अपार्टमेंटमध्ये अतिप्रसंग करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात विविध कलमांनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
संशयित आरोपी अमोल साटम याने संबंधित पीडित युवतीचे व्हॉट्सअॅप हॅक केले होते. याबाबत पीडित युवतीने अमोल साटम याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी त्याने कलमठ बिडयेवाडी येथील एकदंत अपार्टमेंटमध्ये तिला बोलावले. त्याठिकाणी पीडित युवती पोहोचल्यावर समोरून कोणीतही तुझ्याकडे बघत आहे का? असे विचारत तिला तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये यायला सांगितले. तिथे पोहोचल्यावर आरोपीने फ्लॅटचा दरवाजा उघडून तिला आत यायला सांगितले. त्यानंतर पीडित युवतीने एकटीच आत येण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने जबरदस्तीने ओढत तिला फ्लॅटमध्ये नेले.
तसेच तू मला आवडतेस. तुझ्याशी मला लग्न करायचे आहे. असे सांगितले. यावर पीडितेने त्याला तुझे लग्न झालेले आहे. तुला मुलगाही आहे, असे सांगून लग्नास नकार दिला. तसेच मला आता जाऊदे माझी आई वाट बघते आहे असे सांगितले. तेव्हा संशयिताने तिला पकडून लगट करीत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच त्याने त्या फ्लॅटच्या बेडरुममध्ये नेवून तिचा विनयभंग केला.
यादरम्यान पीडित युवती आणि आरोपीत वादावादी झाली. आरोपीने तिला तेथे असलेल्या आॅईलच्या कॅनने मारहाण केली. तसेच हाताच्या थापटाने मारत शिवीगाळ केली. या मारहाणीतून सुटका करीत पीडित युवती बाथरुममध्ये गेली. दरवाजा बंद करीत त्याच अपार्टमेंटमधील मैत्रिणीला मदतीसाठी फोन करण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणीचा फोन लागला नाही. त्यावेळी आरोपीने जोरजोरात बाथरुमचा दरवाजा ठोठावला. आपण बाथरुमच्या बाहेर गेलो तर आरोपी आपल्याला ठार मारेल या भितीने तिने गुडनाईटचे लिक्वीड प्राशन करून बाथरुमचा दरवाजा उघडला. पीडितीने गुडनाईट लिक्वीड प्राशन केल्याचे लक्षात येताच तिच्या हातातील मोबाईल काढून घेऊन तो भिंतीवर आपटला.
त्या दोघांतील वादानंतर पीडितेने घडलेली कहानी आईच्या कानावर घातली. त्यानंतर ताबडतोब नातेवाईकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तिला दाखल केले. ही घटना गुरुवारी कलमठ येथे घडली. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने युवतीला जिल्हा रुग्णालयात हलविले. पीडित युवतीच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.