खड्डयांसह विरोधकांचेही विसर्जन : प्रसाद लाड, महाजनादेश यात्रेसाठी पटांगणाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 01:17 PM2019-09-14T13:17:19+5:302019-09-14T13:21:01+5:30

आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभा होणाऱ्या कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Dissatisfaction of opponents with digs: Prasad Lad | खड्डयांसह विरोधकांचेही विसर्जन : प्रसाद लाड, महाजनादेश यात्रेसाठी पटांगणाची पाहणी

खड्डयांसह विरोधकांचेही विसर्जन : प्रसाद लाड, महाजनादेश यात्रेसाठी पटांगणाची पाहणी

Next
ठळक मुद्देखड्डयांसह विरोधकांचेही विसर्जन : प्रसाद लाडमुख्यमंत्र्यांच्या कणकवलीतील सभा पटांगणाची पाहणी

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इतर पक्षातील नेते भाजप मध्ये येत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोकणातील महामार्गावरील जनतेला त्रासदायक ठरणाऱ्या खड्डयांसह भाजपच्या विरोधकांचेही विसर्जन करण्यात येईल. असे सूचक विधान भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी येथे केले.

कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १७ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गात येणार असून कणकवली येथे जाहिरसभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या सभा होणाऱ्या कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी उपस्थित असलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचनाही केल्या. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या दौºयात रस्त्यावर मला एकही खड्डा दिसता नये. त्यांच्या गाड्यांचा ताफा निर्धोक येईल असे रस्ते तयार करा. कणकवली शहरात महामार्गावर लावलेले बॅरिकेट्स आत सरकवा, अन्यथा काढून टाका. असेही ते यावेळी म्हणाले.

आमदार लाड यांनी सभास्थळी पाहणी करत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा प्रदेश चिटणिस राजन तेली, भाजपा नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, संदेश सावंत- पटेल आदी उपस्थित होते.

कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणाची पाहणी आमदार प्रसाद लाड यांनी केली. यावेळी प्रमोद जठार, संदेश पारकर, राजन तेली, अतुल रावराणे, जिल्हा पोलिस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम उपस्थित होते.

Web Title: Dissatisfaction of opponents with digs: Prasad Lad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.