सफाई कामगारांना ‘हँँडग्लोव्हज्-मास्क’चे वितरण

By admin | Published: June 15, 2016 11:53 PM2016-06-15T23:53:40+5:302016-06-16T01:19:53+5:30

‘लोकमत’च्या वृत्ताची दखल : कामगारांना आरोग्याच्यादृष्टीने साधने वापरण्यास बंधनकारक करा

Distribution of handglow-masks to the cleaning workers | सफाई कामगारांना ‘हँँडग्लोव्हज्-मास्क’चे वितरण

सफाई कामगारांना ‘हँँडग्लोव्हज्-मास्क’चे वितरण

Next

मालवण : पालिका हद्दीतील कचरा उचलण्यासाठी कार्यरत असलेल्या सफाई कामगार हँडग्लोव्हज् आणि मास्क वापरत नसल्याने ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच ठेकेदारांनी सफाई कामगारांना हँडग्लोव्हज् आणि मास्क तसेच रेनकोट उपलब्ध करून दिला आहे. सफाई कामगार उघड्या हातांनी दुर्गंधीयुक्त ओला कचरा भरत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविला होता.पावसाळी हंगामात सफाई कामगारांना दुर्गंधीयुक्त ओला कचरा उचलणे जिकरीचे असते. त्यातच ते पोटासाठी ते काम करतात. मात्र त्यांना देण्यात येणारे हँडग्लोव्हज् आणि मास्क हे कर्मचारी नियमित वापरात नाहीत. ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार त्यांनी वर्षातून चार ते पाच वेळा हँडग्लोव्हज् आणि मास्क देण्यात येतात. असे असताना कामगारांना हँडग्लोव्हज् आणि मास्क वापरण्याच्या सूचना केल्यास ते काम सोडण्याच्या तयारीत असतात. कामगारांनी काम सोडले तर मजूर मिळणे कठीण असते, असे ठेकेदाराने सांगितले.पालिकेकडून जागृती व्हावीशहरात वाढलेले कचऱ्याचे ढीग उचलताना कर्मचाऱ्यांची दमछाक होते. त्या कर्मचाऱ्यांसाठी तो कामाचा भाग असला तरी कुजलेला ओला तसेच दुर्गंधीयुक्त कचरा उचलताना या कर्मचाऱ्यांची परवड होते. कर्मचाऱ्यांकडे असलेले हँडग्लोव्हज् आणि मास्क वापरून जीर्ण होतात.
पावसाळी स्थितीत अशा फाटलेल्या भागातून साथरोग व संसर्गजन्य आजाराची लागण होण्याची भीती असते. यामुळे कर्मचारी सूचना पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई न करता जागृती करणे आवश्यक आहे. सफाई कामगार कचरा उचलत असताना सामान्य नागरिकालाही ते पहावणार नसते. त्यामुळे पालिकेने कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे. तसेच हँडग्लोव्हज् आणि मास्क ही साधने नियमित वापरण्यास बंधनकारक असल्याचे नगरसेवक नितीन वाळके यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)


हँडग्लोव्हज्, मास्कचा वापर करा
पावसाळ्यात किंवा अन्य ऋतूत सफाई कामगार कचरा उचलण्याचे काम करत असतो. अशावेळी तो जणू आरोग्याशी खेळत असतो. पात्र चरितार्थ चालावा यासाठी तो हे काम करत असतो. त्यामुळे स्वच्छताविषयक काम करताना आरोग्याची काळजी कर्मचारी वर्गाने घेणे आवश्यक आहे. हँडग्लोव्हज् आणि मास्क वापरल्यास बऱ्यापैकी आरोग्यावर नियंत्रण राहू शकते. तसेच पावसाळ्यात साथरोग पसरण्याची दाट शक्यता असल्याने भविष्याच्यादृष्टीने साधने वापरणे अनिवार्य आहेत.

Web Title: Distribution of handglow-masks to the cleaning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.