शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

फळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Published: March 19, 2015 8:58 PM

रसायनांचा वापर जास्त : आरोग्यविषयक काळजी घेण्याची गरज

प्रसन्न राणे - सावंतवाडी मानवाच्या शरीराला पोषक घटक म्हणून प्रामुख्याने फळांची गणना केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसातील बदलत्या हवामानाने फळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यामुळे फळांवरील आवरण स्वच्छ धुऊन मुलांना खाण्यासाठी देणे आवश्यक आहे. गेल्या महिन्याभरात उन्हाळी हंगामात पडलेल्या पावसामुळे तसेच सतत सुरू असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळाचे पीक चांगले राहावे, यासाठी विविध रसायने वापरली जातात. यामुळे आहारातील पोषक घटक म्हणून मोठ्या प्रमाणात फळांची उलाढाल होत असते. ही फळे रसायनयुक्त असल्याने या फळांचा वापर स्वच्छ धुऊनच करणे आवश्यक आहे. अन्यथा पोषक घटक देणारी ही फळे जीवितास धोका निर्माण करू शकतात. प्रामुख्याने लहान मुलांना फळे देताना काळजीपूर्वक देणे आवश्यक आहे. हवामानात होणारे बदल यंदा फळांना पोषक असे नसल्याने द्राक्षांसारख्या फळांच्या हंगामात पावसाने आपला जोर कायम केला होता. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी विविध रसायनांचा शेतकऱ्यांनी वापर केला होता. उन्हाळी हंगामात पावसाने जोर कायम केल्याने फळपिकांचे नुकसान होत आहे. यावर्षी फळांच्या पिकावर कीटकनाशकांसाठी मोठ्या प्रमाणावर रसायनांची फवारणी करण्यात आली असल्याचे दिसत आहे. यामुळे फळांवर परिणाम दिसून येत आहे. बाजारातील द्राक्षांचा घड पाहिल्यास द्राक्षांवर फिकट पांढऱ्या रंगाचे आवरण पहायला मिळते. लांबड आणि जाड कातडीची द्राक्षे दिसायला अत्यंत आकर्षक असतात. पण, औषधांच्या अतिफवारणीमुळे या द्राक्षांचाही नैसर्गिक रंग जाऊन त्यावर औषधांचा थर पाहायला मिळतो. फळे धुऊन त्यानंतरच खावीतघरात कोणतीही फळे आणली, तरी ती स्वच्छ धुऊन मगच खायला देणे आवश्यक आह; पण आता त्यात सुधारणा करून, फळे धुऊन आणि स्वच्छ पुसून मगच खायला देणे आवश्यक बनले आहे. लहान मुलांच्या शरीरावर या फळांवरील औषधांचा व कीटकनाशकांचा परिणाम होत असतो. यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र, हा त्रास कशामुळे होतो, याचा कोणालाच पत्ता लागत नसतो. यामुळे रसायनयुक्त फळे लहान मुलांना स्वच्छ धुऊनच किंवा नैसर्गिक फळे देणे आवश्यक आहे. काही रासायनिक खते तेलकट असल्याने त्या तेलकट रासायनिक औषधांचा वापर पाण्यामधून फळांवर केला जातो. मात्र, पाण्यात हे तेलकट रासायनिक मिश्रण मिक्स केल्याने संपूर्ण फळांवर तेलकटपणा तसाच राहत असतो. फळांमध्ये पोषक घटक केवळ हंगामातचकाही फळे हंगामावर पिकत असतात. मात्र, ती फळे वर्षभर बाजारपेठेत विकली जातात. उदा. सफरचंद हे फळ वर्षभर बाजारपेठेत उपलब्ध असते. अशा प्रकारच्या फळांमध्ये फक्त हंगामातच पोषक घटक असून, अन्य हंगामात या फळांमध्ये पोषक घटक राहतातच, असे नाही. प्रगत देशांमध्ये फळांमध्ये रासायनिक खते, किटकनाशकांचा वापर करणे मर्यादित असते. मात्र, आपल्या भागात शेतीतील जमिनीमध्ये फळांच्या पिकांमध्ये रासायनिक खतांचे प्रमाण जास्त असल्याने ही रसायनयुक्त फळे लहान मुलांसाठी सुरक्षित नाहीत. त्यामुळे पपई, चिकू, गावठी केळी, अशी नैसर्गिक फळे लहान मुलांना देणे गरजेचे आहे. - डॉ. दत्तात्रेय सावंत, बालरोगतज्ज्ञ