ऊर्जानिर्मिती कागदावरच

By admin | Published: May 18, 2015 10:40 PM2015-05-18T22:40:14+5:302015-05-19T00:29:46+5:30

खारलँड : घोडे अडले निर्मितीसाठीच्या उपकरणांच्या खर्चापाशी

On energy generated paper | ऊर्जानिर्मिती कागदावरच

ऊर्जानिर्मिती कागदावरच

Next

रत्नागिरी : तालुक्यातील दोन खारलँड बंधाऱ्यांवर अपारंपारिक ऊर्जा तयार करण्याचा खारलँड विभागाचा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. या अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी येणारा खर्च कोण करणार, असा प्रश्न या विभागाला सतावत आहे.जिल्ह्यात कोयना, रत्नागिरी गॅस, जिंदाल, फिनोलेक्स असे वीज तयार करणारे मोठे प्रकल्प आहेत. तरीही राज्याला विजेची कमतरता भासते. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन करण्यात येते. त्यानंतर आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प येत आहे.जिल्ह्यात १७१ खारलँड बंधारे बांधण्यात येणार असून आतापर्यंत ६९ खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत़ समुद्राच्या लाटांच्या माध्यमातून अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये प्रयत्न करण्यात आला होता. तो अयशस्वी झाल्यानंतर खारलँड विभागानेही अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे व चाफेरी कासारी या गावांतील खारलँड बंधाऱ्यांची निवड केलेली आहे.या बंधाऱ्यांमध्ये समुद्राचे पाणी वेगात आतमध्ये शिरत असल्याने त्याचा फायदा घेण्यात येणार आहे. गावडेआंबेरे खारलँडबंधाऱ्याला ६५ झडपे तर चाफेरी कासारी खारलँड बंधाऱ्याला २२ झडपे आहेत. या दोन्ही खारलँड बंधाऱ्यांच्या प्रत्येकी दोन झडपांचा वापर अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यासाठी वापर करण्यात येणार आहे. दिवसातून २ वेळा भरती व २ वेळा ओहोटीच्या फायदा घेऊन ४ किलोवॅट ऊर्जा तयार करण्यात येणार आहे.ऊर्जानिर्मितीपूर्वी या बंधाऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार होते. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मेढाकडे पाठविण्यात येणार होता. त्याची तयारीही सुरु झाली होती. मात्र, ही तयारी करीत असतानाच ही ऊर्जानिर्मितीसाठी सुरुवातीला त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. तो खर्च खारलँड विभागाला परवडणारा नाही. त्यामुळे हा खर्च कुठून करावा, असा प्रश्न खारलँड विभागासमोर उभा राहिला आहे. एवढा खटाटोप करेपर्यंत खर्चाचा प्रश्न खारलँड विभागाने विचारातच घेतला नव्हता. मात्र प्रत्यक्ष खर्च करण्याची वेळ आली त्यावेळी मात्र हा विभाग अडचणीत आला. त्यामुळे ऊर्जा तयार करण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. (शहर वार्ताहर)


वीज फायदेशीर पण...
खारलँड विभागाने निवडलेल्या दोन बंधाऱ्यांवर ४ किलोवॅट अपारंपारिक ऊर्जा तयार करण्यात येणार होती. त्यामुळे भविष्यात छोट्या गावांसाठी ही ऊर्जानिर्मिती फायद्याची ठरली असती. मात्र, खारलँडकडे त्यासाठी तरतूद नसल्याने हे प्रस्ताव बारगळलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी खारे पाणी घुसते, त्या त्या ठिकाणी खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ही वीज फायदेशर होती.

Web Title: On energy generated paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.