- अनंत जाधवसावंतवाडी : ब्रेक द चेन अंर्तगत कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध स्तरावर कडक पाउले उचलत असतनाच कोरोना बाबत संवेदनशील राज्याची घोषणा केली असून,त्यात गोव्याचा समावेश आहे.गोव्यातून येणाºयाची कोरोना चाचणी बंधणकारक केल्याने महाराष्ट्रात जरी संचारबंदी असली तरी त्यांची धडकी मात्र गोव्याला भरली आहे.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून संवेदनशील राज्याच्या यादीतून गोव्याचे नाव वगळण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या बंधनामुळे गोव्याच्या पर्यटना बरोबरच इतर बाबतीही मोठा परिणाम होण्याची भिती व्यकत होत आहे.
ब्रेक द चेन अंर्तगत कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध स्तरावर उपाय योजना आखत आहेत.त्यातच महाराष्ट्राने गोव्यासह केरळ राजस्थान, दिल्ली उत्तराखंड व एनसीआर या राज्यातून महाराष्ट्रात येणाºया प्रत्येकांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. ही सर्व राज्ये कोरोना बाबत संवेदनशील असल्याने ही बंदी घातली आहे. याचा मोठा फटका गोव्याला बसला आहे.कारण सध्या अंतरराष्ट्रीय विमानातून येणारा पर्यटक कमी झाला आहे.त्यामुळे गोव्याचे पर्यटन हे देशी पर्यटकांवरच अवलबून आहे.जर महाराष्ट्राने सिमेवर कडक निर्बध आखले तर त्याचा मोठा तोटा गोव्याला सहन करावा लागणार आहे.
त्या शिवाय गोव्यात नोकरीसाठी जाणारे सिंधुदुर्ग मधील अनेक जण आहेत.यात युवक युवती बरोबरच अनेक तरूण ही नोेकरीला जातात जर हे सर्व जण तेथे नोकरीला गेले नाही तर त्या कंपन्याचे ही नुकसान होईल च त्या शिवाय येथील युवक युवतीचा रोजगाराचा प्रश्न ही मोठा निर्माण होईल पण महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या बाबतीत कडक धोरण स्वीकारले आहे.कोणत्या ही प्रकारची हालगर्जाेपणा सरकारला नको आहे. त्यामुळे सर्व सिमवर कडक आरोग्य तपासणी करण्याबाबत सरकार कडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
पण गोव्यासाठी हे कडक निर्बध धोक्याचे आहेत.गोव्याची अर्थव्यवस्थाच ठप्प होईल अशी भिती गोवा सरकारला वाटत असून,त्यामुळे गोव्या च्या मुख्यमंत्र्यानी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.या पत्रात कडक निर्बंधाच्या यादीतून गोवा सरकारचे नाव हटवावे असे आवाहन सावंत यांनी केले आहे.याबाबत अद्याप महाराष्ट्र सरकारने कोणती भूमिका घेतली नाही.मात्र यावर लवकरात लवकर भुमिका घेतली नाही तर त्यांचा तोटा महाराष्ट्राला ही बसू शकतो अशी शक्यता ही वर्तवली जात आहे.
गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.सध्या तरी गोव्याने कडक लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला नाही.पण काहि सार्वजनिक कार्यक्रमावर मात्र बंधने आणली आहेत.तसेच गोव्याचा पर्यटन हंगाम मात्र सुरळित सुरू असल्याचा दिसून येत आहे.