पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रदर्शन भरविणारा चित्रकार हा सद्हृदयी : दिलीप पांढरपट्टे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 03:14 PM2019-09-13T15:14:13+5:302019-09-13T15:17:28+5:30
लोकमत न्यूज नेट्वर्क कणकवली : चित्रकार हे सद्हृदयी असतात. हे आजच्या अखंड लोकमंच आणि जिल्ह्यातील चित्रकारांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात ...
लोकमत न्यूज नेट्वर्क
कणकवली : चित्रकार हे सद्हृदयी असतात. हे आजच्या अखंड लोकमंच आणि जिल्ह्यातील चित्रकारांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ह्यओलावाह्ण चित्र प्रदर्शनातून दिसून आले. नुसती कोरडी सहानुभूती व्यक्त करून सामाजिक बांधिलकी जोपासता येत नाही . तर दुसऱ्यावर ओढवलेल्या प्रसंगाची जाणीव व्हावी लागते. त्यांचे दु:ख आपलेसे वाटावे लागते . या चित्र प्रदर्शनातून हा सद्हृदयी पणा दिसून आला. कलाकारांनी आपल्या कलेतून व्यक्त होत मदतीचा हात पुढे केला ही मदत पुरग्रस्तांसाठी लाख मोलाची ठरेल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले.
कणकवली येथे स्वामी आर्ट गॅलरीत अखंड लोकमंच सिंधुदुर्ग आणि जिल्ह्यातील चित्रकारांच्यावतीने ओलावा चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी अखंड लोकमंचचे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक, व्ही.के.सावंत, डॉ.विद्याधर तायशेटे, अॅड. विलास परब, प्रसाद घाणेकर, गोपी पवार, निलेश पवार, किशोर कदम, इंद्रजित खांबे, मोहन कुंभार, डॉ. अनिल धाकु कांबळी, सुमन दाभोलकर, लक्ष्मण तेली यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
नामानंद मोडक म्हणाले, ओलावा चित्रप्रदर्शनात चित्र विक्रि होऊन किंवा सढळ हस्ते दात्यांनी केलेल्या मदतीतून जी रक्कम प्राप्त होईल ती शासनाकडे सपूर्त केली जाईल. हे प्रदर्शन जनतेसाठी मोफत असेल, सर्वच नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी . असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या श्रीपाद गुरव या स्थानिक कलाकाराचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत संतोष राऊळ, विनायक सापळे, अच्युत देसाई यांनी केले. सुत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. प्रदर्शन यशस्वीतेसाठी शैलजा कदम, स्वप्नील गावडे, चित्तरंजन राणे यांनी परिश्रम घेतले.