चुकीच्या पद्धतीने प्राध्यापकपद मिळविल्याचा आरोप, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:34 PM2019-03-01T12:34:11+5:302019-03-01T12:36:03+5:30

सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रेमानंद अनंत नाडकर्णी यांनी खेमरगज मेमोरीयल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे चुकीच्या पद्धतीने प्राध्यापक पद मिळविले असल्याचा आरोप करून त्यांची पेन्शन रोखून चौकशी करावी या मागणीसाठी बांदा येथील शामसुंदर कल्याणदास धुरी यांच्यासह अन्य तीघांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले आहे.

False accusations of getting professors wrongly, Fasting in front of Sindhudurg Zilla Parishad | चुकीच्या पद्धतीने प्राध्यापकपद मिळविल्याचा आरोप, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर उपोषण

प्रेमानंद नाडकर्णी यांची चौकशी करा या मागणीसाठी बांदा येथील चौघांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. (छायाचित्र विनोद परब)

Next
ठळक मुद्दे बांदा येथे चुकीच्या पद्धतीने प्राध्यापकपद मिळविल्याचा आरोपसिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर उपोषण

सिंधुदुर्गनगरी : सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रेमानंद अनंत नाडकर्णी यांनी खेमरगज मेमोरीयल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे चुकीच्या पद्धतीने प्राध्यापक पद मिळविले असल्याचा आरोप करून त्यांची पेन्शन रोखून चौकशी करावी या मागणीसाठी बांदा येथील शामसुंदर कल्याणदास धुरी यांच्यासह अन्य तीघांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केले आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाडकर्णी यांनी शासन व संस्थेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी बांदा येथील शामसुंदर धुरी, विनोद सावंत, ऋषी हरमळकर, प्रविण देसाई यांनी उपोषण सुरू केले आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रेमानंद नाडकर्णी यांनी सेवेत असताना उच्च माध्यमिक कडे पदोन्नती घेण्यासाठी सेवाशतीर्चा भंग करून शासन व संस्थेची फसवणूक केली आहे. आर्थिक लाभ घेवून शासनाचे अनुदानही लाटलेले आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

 

Web Title: False accusations of getting professors wrongly, Fasting in front of Sindhudurg Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.