कणकवलीत किराणा मालाच्या दुकानाला आग , लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 01:51 PM2020-11-02T13:51:40+5:302020-11-02T13:54:01+5:30

kankvali, fire, sindhdudurg कणकवली मुख्य बाजारपेठ येथील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली . त्यामुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानातील इन्व्हर्टरच्या बॅटरी मध्ये बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Fire at grocery store in Kankavali, loss of lakhs | कणकवलीत किराणा मालाच्या दुकानाला आग , लाखोंचे नुकसान

कणकवलीत किराणा दुकानाला आग लागली.

googlenewsNext
ठळक मुद्दे कणकवलीत किराणा मालाच्या दुकानाला आग , लाखोंचे नुकसानदिलीप बिल्डकॉनचा टँकर , अग्निशामक बंबाच्या सहाय्यांने आगीवर नियंत्रण

सुुधीर राणे

कणकवली : कणकवली मुख्य बाजारपेठ येथील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली . त्यामुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानातील इन्व्हर्टरच्या बॅटरी मध्ये बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या ठिकाणी कणकवली नगरपंचायतच्या अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. मात्र, त्यात पाणी नसल्याने मोठी गैरसोय झाली. त्यांनतर दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर बोलावून त्यातील पाण्याचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले .

सकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास अग्निशामक बंब पाणी भरून घटनास्थळी आला. तसेच दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकरही तिथे आला.त्याद्वारे पाणी मारत आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण आणण्यात आले .

घटनास्थळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने , तहसिलदार रमेश पवार , शिवसेना नेते संदेश पारकर , नगरसेवक सुशांत नाईक , संजय कामतेकर , संजय मालाडकर , सर्वेश शिरसाठ , मेघा गांगण , अण्णा कोदे , शेखर गणपत्ये , बंडू हर्णे , विलास कोरगावकर , विशाल कामत , चेतन अंधारी , सुशील पारकर , मंदार सापळे , महेश गुरव , बंडू गांगण , सुजित जाधव , अनिल हळदिवे , संदीप नलावडे , वैभव आरोलकर , संतोष पुजारे , प्रसाद अंधारी , टिंकू हर्णे , अनिल येडवे , प्रज्वल वर्दम , पांडु वर्दम , राजन पारकर , सुनील पारकर , तुषार कोदे व पोलीस विभागाचे उपनिरीक्षक अवधूत बनकर , बाबर , प्रकाश कदम , पोलीस कैलास इंपाळ , गुरव , कोळी , वाहतूक पोलीस सुरेश शेडगे , संदेश आंबिटकर , वावरे आदी उपस्थित होते .

नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे , मिथुन ठाणेकर , गणेश लाड व अन्य कर्मचारी तसेच नागरिकानी मदत कार्यात सहभाग घेतला.
 

Web Title: Fire at grocery store in Kankavali, loss of lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.