इन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्स्फार्मरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 05:36 PM2020-01-11T17:36:15+5:302020-01-11T17:37:00+5:30

इन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्सफॉर्मरने (विद्युत जनित्र) गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक पेट घेतला. तब्बल अर्धा तास ट्रान्स्फार्मर पेटत होता. दरम्यान, त्या ठिकाणाहून प्रवास करणारे सावंतवाडी शिवसेनेचे कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी याबाबतची माहिती बांदा पोलीस ठाण्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तत्काळ सर्व यंत्रणा हलली. रात्रीच युद्धपातळीवर ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

Fire at Transformer at Insuli-Khamdev Naka | इन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्स्फार्मरला आग

इन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्स्फार्मरला आग

Next
ठळक मुद्देइन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्स्फार्मरला आगरात्रीच युद्धपातळीवर ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती

बांदा : इन्सुली-खामदेव नाका येथील ट्रान्सफॉर्मरने (विद्युत जनित्र) गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक पेट घेतला. तब्बल अर्धा तास ट्रान्स्फार्मर पेटत होता. दरम्यान, त्या ठिकाणाहून प्रवास करणारे सावंतवाडी शिवसेनेचे कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांनी याबाबतची माहिती बांदा पोलीस ठाण्यासह महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तत्काळ सर्व यंत्रणा हलली. रात्रीच युद्धपातळीवर ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, येथील वीज वितरणचे सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे या ठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला.

यामुळे बांदा शहरातील वीजपुरवठा रात्रीच्या वेळी खंडित झाला होता. तत्काळ आग विझविल्याने ट्रान्स्फार्मरचेही नुकसान झाले नाही. शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे अभियंता आपटेकर यांनी सांगितले. रात्रीच युद्धपातळीवर ट्रान्स्फार्मरची दुरुस्ती करण्यात आली.

Web Title: Fire at Transformer at Insuli-Khamdev Naka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.