कणकवली : येथील नगरवाचनालयाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते आनंद आळवे यांनी केलेल्या आर्थिक नियोजनातून नाथ पै वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत कणकवली एस.एम. हायस्कुलच्या केतकी काकतकर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे.या स्पर्धेत एकविस विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. स्पर्धेत द्वितीय क्रमांक कासार्डे हायस्कुलच्या मृण्मयी गायकवाड़ तर तृतीय क्रमांक शिरवंडे माध्यमिक विद्यालयाच्या सोनिया कासले हिने मिळविला आहे.उत्तेजनार्थ पारितोषिक शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्याअंकिता ठाकुर व नाटळ माध्यमिक विद्यालयाच्या समीक्षा रासम यांना देण्यात आले.' वक्ता दशसहस्त्रेषु' अशी ख्याती असलेल्या बॅ. नाथ पै यांच्या कार्याचे स्मरण शालेय विद्यार्थ्याना सतत व्हावे या हेतुने या स्पर्धेचे आयोजन गेली तिन वर्षे केले जाते.
स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. या स्पर्धेच्या उदघाट्न प्रसंगी आमदार नीतेश राणे, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड़, रविंद्र मुसळे, दादा कुडतरकर, उदय आळवे , वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र सावंत तसेच शिक्षक व पालक उपस्थित होते.प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष डी.पी.तानवडे यानी केले. परीक्षक म्हणून दत्तात्रय मुंडले यानी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरवाचनालयाचे कार्यवाह महेश काणेकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाचनालयाच्या ग्रन्थपाल जान्हवी जोशी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.