सिंधुदुर्गात जलप्रलय; सांगवे येथे एकाचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 12:59 PM2019-08-06T12:59:51+5:302019-08-06T13:00:20+5:30

गेले चार दिवस उसंत न घेता पाऊस धुवांधार पडत आहे.

Flood in Sindhudurg; One drowned in Sangwe | सिंधुदुर्गात जलप्रलय; सांगवे येथे एकाचा बुडून मृत्यू 

सिंधुदुर्गात जलप्रलय; सांगवे येथे एकाचा बुडून मृत्यू 

googlenewsNext

सिंधुदुर्ग : आज तिसऱ्या दिवशी पावसाने जनजीवन विस्कळीत केले. पुराच्या पाण्यात वाहून कणकवली तालुक्यातील  सांगावे येथील मनोहर रामचंद्र कांबळे(47) याचा मृत्यू झाला.वाहतुकीच्या मार्गावर पाणी चढल्याने अनेक ठिकाणच्या बस फेऱ्या बंद कराव्या लागल्या.आचरा मार्ग, कुंभवडे, असरोंनडी ,बिडवडी ,भरणी या गावांना जाणाऱ्या मार्गावर पाणी चढले होते.रेल्वेचे मात्र वेळापत्रक सुरळीत झाले आहे.

गेले चार दिवस उसंत न घेता पाऊस धुवांधार पडत आहे. त्यामुळे नद्यानाले भरून पूर स्थिती निर्माण झाली आहे. संगवे येथील मनोहर कांबळे हे खडशी नदीतून रात्री 8 वा.वाहून गेले होते त्यांचा शोध सुरू होता सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. तालुक्यात 265 मिमी पावसाची नोंद झाली असून खरेपाठण बाजारपेठेत पाणी घुसले, कणकवली शहरात काही सखल भागातही पाणी तुंबले. गडनदी,जाणवली सुखनदी, शिवगँग नदीनी पूर रेषा ओलांडली आहे

कुडाळ -शिवापूर, वसोली, आंजीवडे, उपवडे गावांचा आठ दिवस संपर्क तुटलेलाच.!

कुडाळ तालुक्याती माणगाव खोऱ्यातील बहुतांश गावे संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत.शिवापूर,वसोली,उपवडे ही गावे जोडणाऱ्या पुलांवर गेले आठ दिवस पाणी असल्याने, वाहतून बंद आहे.झाड मोडून पडल्याने विजतारा तुटल्या,त्या दुरुस्त करता येत नाही गावात लाईट नाही, त्यामुळे मोबाईल टॉवर बंद झाला आणि कम्युनिकेशन यंत्रणाही बंद झाली.

Web Title: Flood in Sindhudurg; One drowned in Sangwe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.