पिता-पुत्र यांच्यात वेरळ येथे हाणामारी, चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:25 AM2019-09-17T11:25:08+5:302019-09-17T11:26:14+5:30

मालवण : घरगुती कारणावरून वेरळ थळकरवाडी येथे पिता-पुत्रामध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी बाळकृष्ण मेस्त्री व राजेंद्र मेस्त्री ...

Four of the father and son were booked in Verala, four were booked | पिता-पुत्र यांच्यात वेरळ येथे हाणामारी, चौघांवर गुन्हा दाखल

पिता-पुत्र यांच्यात वेरळ येथे हाणामारी, चौघांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देपिता-पुत्र यांच्यात वेरळ येथे हाणामारीचौघांवर गुन्हा दाखल : परस्परविरोधी तक्रारी

मालवण : घरगुती कारणावरून वेरळ थळकरवाडी येथे पिता-पुत्रामध्ये हाणामारी झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी बाळकृष्ण मेस्त्री व राजेंद्र मेस्त्री या पिता-पुत्रांनी येथील पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वेरळ थळकरवाडी येथील बाळकृष्ण श्रीधर मेस्त्री यांचे त्यांच्या मुलांशी पटत नाही. रविवारी मेस्त्री यांच्या सुनेचे व मुलीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेला मुलगा राजेंद्र मेस्त्री व बाळकृष्ण मेस्त्री यांच्यामध्ये हाणामारी झाली.

बाळकृष्ण मेस्त्री यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजेंद्र मेस्त्री याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी राजेंद्र मेस्त्री याने दिलेल्या तक्रारीनुसार बाळकृष्ण श्रीधर मेस्त्री, सुरेखा बाळकृष्ण मेस्त्री, दीपाली बाळकृष्ण मेस्त्री यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मसुरे पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष नांदोसकर, हरिश्चंद्र्र जायभाय, विवेक फरांदे हे करीत आहेत.

Web Title: Four of the father and son were booked in Verala, four were booked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.