मासेमारी बंदराच्या विकासासाठी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:22 PM2019-01-29T14:22:47+5:302019-01-29T14:25:34+5:30
पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ करिता लहान मासेमारी बंदरांचा विकास योजनेतर्गत कुडाळ व मालवणमधील विविध विकास कामांसाठी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
मालवण : पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ करिता लहान मासेमारी बंदरांचा विकास योजनेतर्गत कुडाळ व मालवणमधील विविध विकास कामांसाठी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
मालवण धुरीवाडा चिवला बीच खडकापर्यंत जाणारा जोडरस्ता तयार करणे यासाठी १६ लाख ५४ हजार, मालवण दांडी दांडेश्वर येथे मासळी सुकविण्याचा ओटा बांधणे २१ लाख ३९ हजार, मालवण दांडी आवार येथे मासळी सुकविण्याचा ओटा बांधणे २४ लाख ८७ हजार, मालवण दांडी मोरेश्वरवाडी येथे ओटा, बंधारा करणे २१ लाख ४१ हजार, चेंदवण खालची मळेवाडी येथील जेट्टीची लांबी वाढवणे २४ ला ६८ हजार, चेंदवण खालची मळेवाडी येथील जेट्टीची मासळी केंद्राला जोडणारा रस्ता तयार करणे २४ लाख ४० हजार, कवठी येथील बंदरवाडी येथे मासळी सुकविण्याचा ओटा तयार करणे १४ लाख ६७ हजार, कवठी येथे उघडा निवारा बांधणे १५ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.