गोव्याप्रमाणेच शिथिलता द्या : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांचे वेधले लक्ष- प्रमोद जठार यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 03:11 PM2020-05-06T15:11:11+5:302020-05-06T15:12:34+5:30
या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत.
कणकवली : गोवा सरकारप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्याची मागणी माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गोवा राज्याने ज्याप्रमाणे सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडण्यास बंदी केली, त्याच धर्तीवर निर्णय घेण्याची गरज आहे. सिंधुदुर्गात शेतकरी, मजूर यांना आता अवघा महिना बेगमीच्या कामांसाठी शिल्लक राहिला असून या महिन्याभरात पावसाळ्याची पूर्वतयारी व बेगमीचा बाजार करण्यासाठी मुभा देण्याची गरज आहे. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांचे आपण लक्ष वेधले आहे.
सिंधुदुर्गबाहेर असलेल्या जिल्हावासीयांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा. मात्र, त्यांची तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. तसेच त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात यावा.
या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात येणाऱ्यांना पेड क्वारंटाईन करण्यात यावे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना औषधे व पावसाळ्याच्या तयारीच्या दृष्टीने शेतक-यांना आवश्यक असणा-या वस्तू व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. शेतक-यांना पावसाळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत, त्यांची दुकाने सुरू न ठेवल्यास शेतकºयांचे पावसाळ्यात हाल होणार आहेत.
अनेकांची घरे अर्थवट स्थितीत आहेत. पावसाळ्यातील लाकडे साठा करून ठेवण्यासाठी गावात मजूर उपलब्ध होत नाहीत. संचारबंदी असल्याने मजूर कामाला जाण्यास घाबरत आहेत. अशा स्थितीत जिल्हाधिका-यांनी याबाबत अधिकृत आदेश देण्याची गरज आहे.
सिंधुदुर्गातील दोन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरील
जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह घराचे बांधकाम, छपराचे काम, पत्रे, प्लास्टिक, ताडपत्री अशा अनेक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. बेगमीच्या बाजारासाठी किराणा व त्या अनुषंगाने दुकाने दिवसभर सुरु ठेवून जिल्ह्यातील शेतकºयांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.
सिंधुदुर्गात सापडलेले दोन्ही रुग्ण मुंबईहून आलेले होते. त्याचा फटका लॉकडाऊन काटेकोर पाळणा-या सिंधुदुर्गवासीयांना बसता नये. या दृष्टीने काळजी घेण्याची मागणीही प्रमोद जठार यांनी केली आहे.