ठळक मुद्देनारायण राणे यांना भारत सरकारने दिली वाय दर्जाची सुरक्षा !दोन अधिकाऱ्यास ११ सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात
कणकवली : माजी मुख्यमंत्री, भाजपा नेते खासदार नारायण राणे यांच्या सुरक्षेत आणखीन वाढ करण्यात आली असून भारत सरकारची वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.यात दोन अधिकाऱ्यास ११ सुरक्षा रक्षकांचे पथक तैनात केले आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाने आढावा घेऊन काही नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून , त्यामध्ये भाजपा खासदार नारायण राणे यांना ही वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.
सध्या राज्यसरकरची वाय सुरक्षा आहे त्याचा आढावा केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आणि भारत सरकारच्या वाय दर्जाची सुरक्षा वाढविली आहे.