Sawantwadi Rain: सावंतवाडीत मुसळधार; नदी-नाल्यांना पूर आल्यानं वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:06 PM2019-08-06T15:06:59+5:302019-08-06T15:07:14+5:30

Sawantwadi Flood: सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरात गेले तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच परिसर जलमय झाला आहे.

heavy rain in Sawantwadi | Sawantwadi Rain: सावंतवाडीत मुसळधार; नदी-नाल्यांना पूर आल्यानं वाहतूक ठप्प 

Sawantwadi Rain: सावंतवाडीत मुसळधार; नदी-नाल्यांना पूर आल्यानं वाहतूक ठप्प 

googlenewsNext

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरात गेले तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच परिसर जलमय झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा-तळवडे-ओटवणे-कोळगाव-मळगाव-मळेवाड-आरोंदा येथील सखल भागात असलेले अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून, वीजवाहिनी तुटल्याने सावंतवाडी तालुक्यातील बत्ती गुल झाली आहे.

सावंतवाडी तालुक्यात गेले तीन दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नदी-नाले, ओढे यांना पूर आल्यामुळे अनेकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने विद्यार्थीही घरीच थांबले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने भात शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.

मळगाव रेडकरवाडी येथे वामन राणे यांच्या शेतमांगरावर सांगवानचे झाड कोसळले. यावेळी या शेतमांगरात गुरे बांधली होती. मात्र सुदैवाने लगत असलेल्या आंब्याच्या झाडाला विराट अडकल्याने मोठी हानी टळली. रेडकर वाडीतील विजय हरमलकर यांच्या घरालगत असलेले सांगावयाचे मोठे झाडही उन्मळून पडले. मात्र हे झाडही दोन घरांच्या मधोमध पडल्याने मोठी नुकसानी टळली. ब्राह्मणपाट येथे स्ट्रीट लाईटच्या विद्युत वाहिनीवर झाड पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. गेले चार दिवस सलग वेगवेगळ्या ठिकाणी झाडे पडल्यामुळे या परिसरातील बत्ती गुल झाली आहे.

सावंतवाडी वेंगुर्ले राज्य मार्गावरील होडावडा नदीला पूर आल्यामुळे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. तळवडे बाजारपेठेतही  पाणी शिरले असून, आरोंदा येथहीे परिसर जलमय झाला आहे. कोलगाव येथे ही नदी दुथडी भरून वाद असल्यामुळे संपर्क तुटला आहे. बांदा परिसरातही तेरेखोल नदीला पूर आल्यामुळे पाणीच पाणी झाले असून शेर्लेतील चार घरांना पाण्याने वेढा घातला आहे. यातील चार कुटुंबे पाण्यात अडकले असून मदतकार्य सुरू आहे.

Web Title: heavy rain in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.