Video: तिलारी धरण प्रवण क्षेत्रात हायअलर्ट; चारही दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 09:31 PM2019-08-06T21:31:43+5:302019-08-07T21:14:02+5:30

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी नाले तुडुंब भरले आहेत तिकडे  तिलारी धरण पूर्णता भरले असून ...

High Alert in the Tilari dam prone area | Video: तिलारी धरण प्रवण क्षेत्रात हायअलर्ट; चारही दरवाजे उघडले

Video: तिलारी धरण प्रवण क्षेत्रात हायअलर्ट; चारही दरवाजे उघडले

googlenewsNext

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. नदी नाले तुडुंब भरले आहेत तिकडे  तिलारी धरण पूर्णता भरले असून धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहे. मंगळवारी एका दिवसात तिलारी धरण प्रवण क्षेत्रात 327 मिलीमीटर पावसांची नोद झाली आहे.

धरणांची धोक्याची पातळी ओळखून धरणातून 1058 क्युमेक्स एवढा पाण्याचे विसर्ग सुरू करण्यात आला असून तिलारीच्या खालच्ये सर्व नदी क्षेत्रातील गावाने प्रशासनाने हायअर्लट जारी  केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे वाहतूक बंद झाली आहे अशातच तिलारी धरणक्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहेत.

धरणातून मंगळवारी सायंकाळी 1058 क्युमेक्स एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर मंगरूळ धरण प्रवण क्षेत्रात 327 मिलिमीटर एवढा पाऊस पडला असून या पावसाचे प्रमाण इतर वेळी पडलेल्या पावसापेक्षा जास्त आहे त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरण प्रवण क्षेत्रातील खालील सर्व नदीलगत असणाऱ्या सर्व घरांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे. तिलारी कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांनी सकाळीच जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याशी संपर्क साधून धरण क्षेत्रात पाण्याची पातळी वाढत असल्याची कल्पना दिली त्यानंतर महसूल यंत्रणा व पोलीस विभागाला अलर्ट करण्यात आले आहे.

Web Title: High Alert in the Tilari dam prone area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.