राणेंच्या रुग्णालयाचा किती लोकांना फायदा झाला? : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 03:37 PM2021-06-18T15:37:08+5:302021-06-18T15:38:53+5:30

Politics Sindhudurg : भाजपच्यावतीने करण्यात आलेले आंदोलन हे त्यांचेच अपयश आहे. राणेंच्या रुग्णालयाचा किती लोकांना फायदा झाला, याचे उत्तर भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला द्यावे. राणेंनी आपल्या रुग्णालयात ५० व्हेंटिलेटर बेडची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले.

How many people benefited from Rane's hospital? : Vaibhav Naik | राणेंच्या रुग्णालयाचा किती लोकांना फायदा झाला? : वैभव नाईक

राणेंच्या रुग्णालयाचा किती लोकांना फायदा झाला? : वैभव नाईक

Next
ठळक मुद्देराणेंच्या रुग्णालयाचा किती लोकांना फायदा झाला? : वैभव नाईक आमच्या सहकार्यामुळेच कोविड लॅब, ७५ बेडना मान्यता

मालवण : भाजपच्यावतीने करण्यात आलेले आंदोलन हे त्यांचेच अपयश आहे. राणेंच्या रुग्णालयाचा किती लोकांना फायदा झाला, याचे उत्तर भाजप कार्यकर्त्यांनी जनतेला द्यावे. राणेंनी आपल्या रुग्णालयात ५० व्हेंटिलेटर बेडची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान आमदार वैभव नाईक यांनी दिले.

मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार नाईक यांनी येथील नगर पालिकेच्या नगराध्यक्ष दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, सन्मेश परब, तपस्वी मयेकर आदी उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, मालवणात २० ऑक्सिजन बेडची सुविधा केली आहे. फिजिशियन उपलब्ध होताच व्हेंटिलेटर बेडची व्यवस्थाही सुरू केली जाईल. गावागावात तसेच पालिका क्षेत्रातही विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. येत्या पंधरा दिवसात ही रुग्णसंख्या थांबेल, असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला.

कोविड लॅबला शिवसेना विरोध करत आहे, असे भाजपने सांगितले होते. त्यांच्या आमदार फंडातून जी कोविड लॅब झा,ली त्याला आम्ही तत्काळ मान्यता दिली. त्या कोविड लॅबचा किती लोकांना फायदा झाला. किती लोकांचे पैसे माफ झाले, याचे उत्तर भाजपच्या लोकांनी द्यायला हवे. आता त्यांच्या मागणीनुसार जे ७५ बेड होत आहेत, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे शासनाकडून जे जे सहकार्य लागेल ते आम्ही देऊ. मात्र, या ७५ बेडचे कोविड लॅबसारखे होता कामा नये. त्यांना मोफत सुविधा द्यायला हव्यात, असा टोला नाईक यांनी लगावला.

पेंडूर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड

कट्टा परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे तेथील रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच कट्टा - पेंडूर उपजिल्हा रुग्णालयात २० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

Web Title: How many people benefited from Rane's hospital? : Vaibhav Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.