हिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:53 PM2020-12-02T17:53:07+5:302020-12-02T17:54:49+5:30

Politics, Rajan Teli, Vaibhav Naik, sindhudurg गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकासकामे केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी त्यांच्यात हिंमत असेल तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुक स्वबळावर लढवावी. असे आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे.

If there is courage, Shiv Sena should contest elections on its own: Rajan Teli's challenge | हिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान

हिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान

Next
ठळक मुद्देहिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान राज्य सरकारने घोषणा केलेल्या कर्जमाफीचे काय झाले ? ते वैभव नाईक यांनी जाहीर करावे

कणकवली: गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकासकामे केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी त्यांच्यात हिंमत असेल तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुक स्वबळावर लढवावी. असे आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे.

कणकवली येथील भाजपा कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, निवडणुका जाहीर होण्याअगोदरच महाविकास आघाडीच्यावतीने एकत्रित निवडणुका लढवणार ही भूमिका शिवसेना खासदार व आमदार घेत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात भाजपची ताकद वाढली आहे हे स्पष्ट होत आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केवळ घोषणा करुन जनतेची दिशाभूल सत्ताधारी करत आहेत.

ठाकरे सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भाजपाच्यावतीने सरकारच्या विरोधात संपूर्ण राज्यात पत्रकार परिषदा घेण्यात आल्या . पक्ष आदेशाप्रमाणे प्रदेश सरचिटणीस असलेल्या आमदार रविंद्र चव्हाण यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही त्यादिवशी पत्रकार परिषद घेतली.

सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण करताना जनतेची कशी दिशाभूल केली ? याबाबत त्यात माहिती देण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे वरीष्ठ नेते आहेत. राज्यात जी जबाबदारी त्यांना दिली त्यांनी ती पार पाडली. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी चुकीचे मुद्दे चर्चेत आणून कोणताही फरक पडणार नाही.

एसटीचे ३०० चालक - वाहक मुबंईला गेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे .ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. एका आठवड्यात एसटीच्या सर्व फेऱ्या सुरु न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

आमदारांकडे आलिशान गाडया आहेत.पण एसटीने गोरगरीब नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. शाळा,विद्यालयात विद्यार्थी व अन्य लोक एसटीने येत आहेत. सातत्याने एसटीचे प्रश्न का निर्माण होत आहेत ? शिवसेनेचे मंत्री त्यासाठी सक्षम नाहीत का ? कर्मचाऱ्यांना पगार दिले जात नाहीत याला जबाबदार कोण ? हे आमदार नाईक यांनी सांगावे.

निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील नवीन बसस्थानकांची भूमिपूजने करण्यात आली होती. ती पूर्ण झाली आहेत का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. माजी पालकमंत्री यांनी निवडणूकीच्या तोंडावर काही भूमिपूजने केली होती ,त्यांचे काय झाले ? या प्रश्नांची उत्तरे आधी शिवसेनेने द्यावीत. शिवसेना जिल्ह्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सत्ता असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळत नाही. आरोग्य सेवा कोलमडली आहे. शेकडो पदे रिक्त असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री असून देखील जनतेला न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

नुकसान भरपाईचे ६५ कोटी फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेले होते. जिल्हा नियोजन आराखडा अडीचशे कोटीचा होता तो १४० कोटींवर आणला आहे. त्याबाबत शिवसेनेने बोलावे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चालू केल्यास आम्ही भाजपच्यावतीने शिवसेना नेत्यांचा जाहीर सत्कार करु. मात्र, त्या केवळ घोषणा ठरु नयेत .जिल्हा आरोग्य विभागात ५३६ रिक्त पदे आहेत ती अगोदर भरा.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले? ते पैसे अजून मिळाले नाहीत .सरकारवर ५ .२ लाख हजार कोटीचे कर्ज आहे .महसुली तूट ३५ हजार कोटी झाली आहे.भात नुकसानभरपाई पैसे आलेले नाहीत. त्यामुळे केवळ हवेत गोळीबार करू नये . असेही राजन तेली यावेळी म्हणाले.
 

Web Title: If there is courage, Shiv Sena should contest elections on its own: Rajan Teli's challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.