खाकशी तिठा येथील तपासणी नाक्याचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 02:58 PM2020-05-06T14:58:27+5:302020-05-06T14:59:01+5:30
देवगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे नगरपंचायतीमार्फत तीन ठिकाणी तपासणी नाके कार्यरत करण्यात आले असून खाकशी तिठा येथील तपासणी ...
देवगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवगड जामसंडे नगरपंचायतीमार्फत तीन ठिकाणी तपासणी नाके कार्यरत करण्यात आले असून खाकशी तिठा येथील तपासणी नाक्याचा शुभारंभ नगराध्यक्षा प्रणाली माने यांच्या हस्ते करण्यात आला.
नगरपंचायतीमार्फत खाकशी तिठा, वाडातर पूल, तारामुंबरी पूल या ठिकाणी तपासणी नाके केले आहेत. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, बाळा खडपे, वाहतूक पोलीस एफ. जी. आगा, नगरसेवक, नगरपंचायत कर्मचारी, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या नाक्यांवर बाहेरून देवगड जामसंडेमध्ये येणाऱ्या वाहनांमधील लोकांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इन्फारेड गनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच बाहेरून येणाºया गाड्यांचीही नोंद ठेवणार आहे.
खाकशी तिठा येथे तपासणी नाक्याचा शुभारंभ नगराध्यक्षा प्रणाली माने यांच्या हस्ते झाला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर आदी उपस्थित होते.