कणकवली : कणकवली तालुक्यातील नागवे तलाठी कार्यालयात जमिनीचा सातबारा मागण्यासाठी नंदकिशोर भिवा सुतार (५४, रा. नागवे-भटवाडी) हा गेला होता. त्याने रागाने तलाठी शालिनी नारायण येडगे यांच्या मानेवर भात कापायची कोयती उगारत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, शालिनी नारायण येडगे (४०) या नागवे येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्या गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तलाठी कार्यालयात काम करीत होत्या.यावेळी संशयित आरोपी नंदकिशोर सुतार यांचा मुलगा आकाश हा कार्यालयात येऊन त्यांच्या भातशेतीच्या जमिनीचा सातबारा उतारा घेऊन गेला. त्यानंतर ११ वाजण्याच्या सुमारास नंदकिशोर सुतार हा अचानक तलाठी कार्यालयात भात कापणीची कोयती हातात घेऊन आला. त्याने शालिनी येडगे यांना ह्यमला सारख्या फेऱ्या घालायला लावता का ? तू इथे कसे कामकाज करतेस तेच बघतो. निघ येथून नाहीतर तुला आता ठारच मारुन टाकतोह्ण असे म्हणून त्याने हातातून आणलेली कोयती येडगे यांच्या मानेवर ठेवली.या घटने प्रकरणी शालिनी येडगे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी नंदकिशोर याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला अटक करण्याची प्रक्रिया गुरुवरी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. खंडागळे करीत आहेत.कोयती हातात घेऊन निघून गेलानंदकिशोर सुतार याने कोयती पोटाला लावली व कोथळाच बाहेर काढतो. ठार मारतो, अशी धमकी दिली. मात्र, यावेळी तलाठी कार्यालयात काम करीत असलेले कोतवाल रत्नाकर भगवान सावंत व कृषी सहाय्यिका उज्ज्वला तेली यांनी नंदकिशोर सुतार याला हाताने धरुन बाजूला केले व त्याच्या तावडीतून येडगे यांची सुटका केली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात बसलेले सरपंच नारायण आर्डेकर, ग्रामसेवक वर्षा कदम, शिपाई यशवंत तायशेटे, कर्मचारी रमाकांत हुले यांना पाहून नंदकिशोर कोयती हातात घेऊन निघून गेला.
महिला तलाठ्यावर कोयती उगारली, नागवे येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 5:10 PM
kankavli, crimenews, sindhudurgnews, police कणकवली तालुक्यातील नागवे तलाठी कार्यालयात जमिनीचा सातबारा मागण्यासाठी नंदकिशोर भिवा सुतार (५४, रा. नागवे-भटवाडी) हा गेला होता. त्याने रागाने तलाठी शालिनी नारायण येडगे यांच्या मानेवर भात कापायची कोयती उगारत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देमहिला तलाठ्यावर कोयती उगारली, नागवे येथील घटना आरोपी ताब्यात, ठार मारण्याची दिली धमकी, अटकेबाबत कार्यवाही सुरू