ठाकरे सरकार असताना कणकवली शहरावर अन्याय, नितेश राणे यांचा आरोप
By सुधीर राणे | Published: April 12, 2024 04:19 PM2024-04-12T16:19:11+5:302024-04-12T16:20:03+5:30
कणकवली : ठाकरे सरकारने कणकवली नगरपंचायतच्या विकासकामांत नेहमी खोडा घातला. येथून पाठवलेल्या विकासकामांच्या प्रस्तावाला केराची टोपली कायम दाखवली. याचा ...
कणकवली : ठाकरे सरकारने कणकवली नगरपंचायतच्या विकासकामांत नेहमी खोडा घातला. येथून पाठवलेल्या विकासकामांच्या प्रस्तावाला केराची टोपली कायम दाखवली. याचा जाब खासदार विनायक राऊत याना शहरवासीयांनी विचारला पाहिजे. ठाकरे सरकार असताना कणकवली शहरावर अन्याय झाला आहे असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.
कणकवली येथे मातोश्री मंगल कार्यालयात केंद्रीय लघु,सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा झाला. यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेविका राजश्री धुमाळे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजप अनुसूचित सेल जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, शहराध्यक्ष अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, एकीकडे भाजपा नेत्यांवर टीका करायची आणि दुसरीकडे भाजपात घेण्यासाठी विनवणी करायची. असे काही विरोधकांचे चालले आहे. मागील पाच वर्षांत कणकवली शहराचा केलेला विकास जनतेसमोर त्यांनी यावेळी सांगितले.