सावंतवाडी : मागील तीन दिवस अहाेरात्र ढगफुटी सारखा पाऊस कोसळत असल्याने आतंरराज्य वाहतुकीवर परिणाम झाला आहे.आंबोली घाट,राम घाट व चोरला घाट बंद असल्याने आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली आहे. आंबोली घाटात आज आठ ठिकाणी झाडे कोसळली तर एका ठिकाणी भली मोठी दरड रस्त्यावर आली आहे गेले.
पाऊस सतत तीन दिवस कोसळत आहे ढगफुटीसारखा कोसळणाऱ्या या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबोली भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आठ ठिकाणी झाडे कोसळली ती रस्त्यावर आल्याने खेळखंडोबा उडाला.आंबोली घाटात बस अडकली असल्याचे समजताच पोलिसांची व्हॅन जात असताना दरड या गाडी समाेर आली,त्यामुळे सुदैवाने पोलीस बालंबाल बचावले.
आंबोली -सावंतवाडी ,अंबोली -काेल्हापूर, सावंतवाडी बेळगाव वाहतुक ठप्प झाली आहे .गोवा- दोडामार्ग- रामघाट -बेळगाव आणि चोरला -बेळगाव अशी तीन्ही घाटातील आंतरराज्य वाहतूक ठप्प झाली आहे .आंबाेली घाटात दरड कोसळली असून राम घाटात रस्ताच खचला असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे तर चाेरला घाटात दरड रस्त्यावर आल्याने वाहतुक ठप्प झाली.
आज वीज गायब आणि मोबाईल कंपनीचे मोबाईल देखील स्वीच ऑफ झाले आहेत.आंबोलीची दरड कोसळली ती बाजूला करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आंबाेली घाटातील मुख्य धबधब्याच्या जवळच ही दरड कोसळली आहे त्यामुळे हाहाकार उडाला .मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.