मालवण : ओझर- कांदळगाव- मसुरे हा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणेही मुश्कील बनले आहे. वारंवार अपघात घडत आहेत. रस्ते दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप करत संतप्त बनलेल्या कांदळगाव ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी कांदळगाव राणेवाडी तीठा येथे रास्ता रोको आंदोलन छेडले.दरम्यान, मालवण मसुरे तसेच राणेवाडीमार्गे आचरा कणकवली जाणाऱ्या एसटी बसही यावेळी अडवण्यात आल्या. शांततेच्या मार्गाने तब्बल दीड तास आंदोलन सुरू होते. आजारी व्यक्ती, शाळकरी मुले यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांची प्रवास व्यवस्था ग्रामस्थांनी केली होती. पोलीसही फौजफाट्यासह आंदोलनस्थळी हजर होते.या आंदोलनास पंचायत समिती सदस्य सोनाली कोदे, ग्रामपंचायत सदस्य मनोज आचरेकर, युवानेते बाबा परब, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने यांनी पाठिंबा दर्शवला. शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महिला वर्गानेही आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. उमेश कोदे यांनी रस्त्याची झालेली दुर्दशा, अपघातामुळे जखमी झालेले ग्रामस्थ यांच्या व्यथा मांडल्या. तसेच ग्रामस्थांच्या वतीने अधिकाऱ्यांना धारेवर धरले.यावेळी पं.स. सदस्या सोनाली कोदे याही आक्रमक बनल्या. या रस्त्याबाबत पंचायत समिती सभेत नेहमी प्रश्न उपस्थित करूनही बांधकाम विभागाने दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे आता बांधकाम अधिकाऱ्यांनी तोंडी नको लेखी आश्वासन द्यावे, अशी भूमिका कोदे यांनी मांडली. तर बाबा परब यांनीही बांधकाम विभागाला महिनाभरात रस्ता काम सुरू करण्याची डेडलाइन ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आली आहे.दीड तासाने आंदोलन मागेकांदळगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी खड्डेमय रास्ताप्रश्नी रास्ता रोको जनआंदोलन छेडले. अखेर बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन व आ. वैभव नाईक यांनी महिनाभरापूर्वी रस्ता काम सुरू करू. या आश्वासनंतर दीड तासाने ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. बांधकाम अभियंत्यांनी दिलेले लेखी आश्वासन निर्णायक ठरले. रास्ता रोको आंदोलनानंतर ग्रामस्थांनी कांदळगाव ग्रामपंचायतीवर धडक दिली. आंदोलनास उपस्थित नसलेल्या सदस्यांचा निषेध नोंदवण्यात आला.
कांदळगाव ग्रामस्थांचे खड्डेमय रस्त्याच्या प्रश्नावरून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 4:30 PM
Road Sefty Sindhudurgnews- ओझर- कांदळगाव- मसुरे हा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय बनला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणेही मुश्कील बनले आहे. वारंवार अपघात घडत आहेत. रस्ते दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे, असा आरोप करत संतप्त बनलेल्या कांदळगाव ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी कांदळगाव राणेवाडी तीठा येथे रास्ता रोको आंदोलन छेडले.
ठळक मुद्देकांदळगाव ग्रामस्थांचे खड्डेमय रस्त्याच्या प्रश्नावरून आंदोलन प्रशासनाचे दुर्लक्ष : ग्रामस्थ संंतप्त झाल्याने केला रास्तारोको