कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना लस साठा संपला आहे. त्यामुळे नागरिकांना बुधवारी लस उपलब्ध होऊ शकली नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी १५० हून अधिक जणांना कोरोना लस दिली जाते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरण करून घेणेही महत्त्वाचे आहे.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात असलेला कोरोना लसींचा साठा ६ एप्रिलला सायंकाळी संपला. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सकांचे लक्ष वेधले आहे. लस शिल्लक नसल्यामुळे बुधवारी लसीकरण होऊ शकले नाही.दरम्यान, लसीचा साठा संपल्याने हा साठा उपलब्ध झाल्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा लसीकरण केले जाणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासन सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे गुरुवारीही नागरिकांना लस मिळणार नाही.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीचा साठा संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 6:25 PM
Kankvali Sindhudurg- कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना लस साठा संपला आहे. त्यामुळे नागरिकांना बुधवारी लस उपलब्ध होऊ शकली नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी १५० हून अधिक जणांना कोरोना लस दिली जाते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरण करून घेणेही महत्त्वाचे आहे.
ठळक मुद्देकणकवली उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना लसीचा साठा संपला लस शिल्लक नसल्यामुळे होऊ शकले नाही लसीकरण