कणकवली पोलीसांची विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात धडक मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 07:56 PM2021-03-01T19:56:11+5:302021-03-01T19:59:08+5:30
CoronaVirus Kankavli sindhudurgnews- कणकवली पोलिसांनी संपूर्ण तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी धडक मोहीम राबविली. कणकवली शहर, खारेपाटण, नांदगाव, फोंडाघाट व अन्य गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. तालुक्यात ६१ जणांवर दंडात्मक कारवाई करीत १४ हजार ९०० रुपयांचा दंड कणकवली पोलिसांनी वसूल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी दिली.
कणकवली : कणकवली पोलिसांनी संपूर्ण तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी धडक मोहीम राबविली. कणकवली शहर, खारेपाटण, नांदगाव, फोंडाघाट व अन्य गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. तालुक्यात ६१ जणांवर दंडात्मक कारवाई करीत १४ हजार ९०० रुपयांचा दंड कणकवली पोलिसांनी वसूल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी दिली.
विना मास्क फिरणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाईमध्ये ५२ जणांकडून प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे १० हजार ४०० रुपये वसूल केले. तर विना मास्क फिरणाऱ्या नऊ जणांवर प्रत्येकी ५०० प्रमाणे ४५०० रुपये दंड वसूल केला. कणकवली पोलिसांनी तालुक्यात एकूण ६१ जणांवर विना मास्क फिरल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करत १४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानुसार कणकवली पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, वाहतूक पोलीस चंद्रकांत माने व चालक फर्नांडिस यांच्या पथकाने व तालुक्यातील बीट अंमलदार यांच्याकडून करण्यात आली. या कारवाईत सातत्य राहणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी सांगितले.