आंब्यांच्या विविध जातींची माहिती घेतली जाणून
By admin | Published: May 25, 2015 11:48 PM2015-05-25T23:48:51+5:302015-05-26T00:57:06+5:30
वेंगुर्ला फळ संशोधनाला भेट : निवडणूक आयुक्तांकडून पाहणी
वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्याचे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शनिवारी वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली. या भेटीच्यावेळी त्यांनी संशोधन केंद्रामार्फत निर्माण केलेल्या रत्ना, सिंधू, सुवर्णा, कोकण राजा तसेच कोकण सम्राट या आंबा जातींची माहिती घेतली.
संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. एन. सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. या संशोधन केंद्रावर प्रथमच परदेशी आंबा जातीशी संकर करून कोकण सम्राट ही आंबा जात निर्माण
केल्याबद्दल सहारिया यांनी येथील शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
त्यानंतर त्यांनी स्वयंरोजगार निर्मितीच्या दृष्टीने येथील चार प्रयोगशाळांमार्फत घेतलेल्या प्रशिक्षणाबाबत माहिती घेतली. याप्रसंगी त्यांनी येथील चार प्रयोगशाळांना भेट दिली. पी. एस. तल्ला यांनी चारही प्रयोगशाळांबाबत माहिती दिली. तसेच सहारिया यांनी येथील प्रयोगशाळेत उत्पादित
के लेल्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची
पाहणी केली. येथे लागवड केलेल्या अमेरिका, आॅस्ट्रेलिया व इस्रायल या देशातील आंबा जातीची त्यांनी माहिती घेतली.
काजू प्रक्षेत्रावरील भेटीच्या दरम्यान डॉ. आर. सी. गजभिये यांनी त्यांना येथील विविध काजूच्या जातीविषयी माहिती दिली. यावेळी केंद्राच्या संशोधन कार्यात सातत्य राखावे, असे आवाहन सहारिया यांनी केले.
यावेळी सहारिया यांच्यासोबत सावंतवाडी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. एन. सावंत, ए. वाय. मुंज, वैशाली झोटे, पी. एम. तल्ला, एस. एस. भुरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)