आचरा वीज वितरणच्या उपकेंद्राला जमीन देणाऱ्यालाच निमंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 06:32 PM2017-11-07T18:32:19+5:302017-11-07T18:42:01+5:30

 आचरा येथील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वीज वितरणच्या उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला. घाईगडबडीत उरकण्यात आलेल्या या सोहळ्यास आचरा सरपंच चंदन पांगे व जमीन देणारे जमीन मालक निलेश सरजोशी यांना निमंत्रित न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

The landlord is not invited to the sub-station of waste distribution | आचरा वीज वितरणच्या उपकेंद्राला जमीन देणाऱ्यालाच निमंत्रण नाही

 आचरा येथील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वीज वितरणच्या उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला.

Next
ठळक मुद्देआचरा वीज उपकेंद्र अपूर्णावस्थेत असतानाही घाईगडबडीत आटोपले उद्घाटन घाईगडबडीत उरकण्यात आला लोकार्पण सोहळा १५ दिवसांत पूर्णत्वाने उपकेंद्र चालू होणार

आचरा ,दि. ०७ :  आचरा येथील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वीज वितरणच्या उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला. घाईगडबडीत उरकण्यात आलेल्या या लोकार्पण सोहळ्यास आचरा गावचे सरपंच चंदन पांगे व अल्प दराने जमीन देणारे जमीन मालक निलेश सरजोशी यांना निमंत्रित न केल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपूर्णावस्थेतील उपकेंद्राचे घाईगडबडीत उद्घाटन करण्यामागे हेतू काय असा प्रश्न आचरा सरपंच चंदन पांगे यांनी केला.


गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आचरा उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा कोणताही गाजावाजा न करता खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार प. यावेळी शिवसेनेचे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे, प्रसाद मोरजकर, उदय दुखंडे, जगदीश पांगे, चिंदर सरपंच माया सावंत, उपसरपंच अनिल गावकर, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी, आचरा उपअभियंता वीरेंद्र सिंग, सहाय्यक अभियंता दीपक मुघडे, प्रकल्प अधिकारी सचिन शंकर, कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.

१५ दिवसांत पूर्णत्वाने उपकेंद्र चालू होणार

लोकार्पण सोहळ्यानंतर उपकेंद्रामधून वीज पुरवठा चालू झाला आहे का? अशी चौकशी केली असता कार्यकारी अभियंता संजय गवळी व आचरा वीज वितरणचे उपअभियंता सिंग यांनी माहिती दिली की, आचरा परिसरातील २३ गावांचा वीजपुरवठा करण्यासाठी वायंगणी, मुणगे व आडवली असे ११ केव्हीचे तीन फिडर उभारुन ३३ केव्हीच्या वीज वाहिनीला गार्डींग केले जाणार आहे. उपकेंद्र चार्ज केले असून काही किरकोळ कामे पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत ते चालू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.

काम अर्धवट असताना शिवसेनेला उद्घाटनाची कसली घाई : चंदन पांगे

आचरा गावातील वीज प्रश्न सुटावा ही मागणी ग्रामस्थांमधून होत होती. आचरा उपकेंद्राचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. ते चालू व्हावे म्हणून वीज वितरणच्या कार्यालयात फेºया मारल्या. वीज वितरण दखल घेत नसल्याने प्रसंगी उपोषणासही बसलो. त्याची दखल घेतल्याने उपकेंद्राच्या कामास गती मिळाली.

आज आचरे गावाचा सरपंच या नात्याने आपणास कोणतेही निमंत्रण दिले गेले नाही. उपकेंद्राचे काम अर्धवट असताना लोकांना अंधारात ठेऊन घाईगडबडीत उद्घाटनाचा घाट शिवसेनेने कशासाठी घातला? असा प्रश्न करीत ग्रामस्वच्छता सप्ताह चालू असताना उपकेंद्राकडे राहणाऱ्या  कर्मचाऱ्याना साधे शौचालय नाही. याची लोकार्पण करणाऱ्या खासदारांना माहिती नाही का? असा संतप्त प्रश्न आचरा सरपंच चंदन पांगे यांनी केला.

निलेश सरजोशींची नाराजी

आचरा गावात वीज उपकेंद्र व्हावे व विजेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आपली लाखो रुपयांची २ एकर जमीन २०१० साली कवडीमोल दराने वीज वितरणला दिली. त्यावेळी वीज वितरणच्या अधिकाऱ्यानी या उपकेंद्राच्या इमारतीवर आपल्या दिवंगत वडिलांच्या नावाची पाटी लावली जाईल तसेच उपकेंद्राचे उद्घाटन करताना आपल्याला सन्मानित करण्यात येईल असे लेखी पत्राद्वारे सांगितले होते. मात्र आज नावाची पाटी व सन्मान सोडाच पण साधे आमंत्रण दिले गेले नसल्याचे सांगत मूळ जमीनमालक निलेश सरजोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
 

Web Title: The landlord is not invited to the sub-station of waste distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.