विजेचा धक्का बसून मुलाचा मृत्यू, कसबा वाघोटण येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:41 AM2020-01-21T11:41:59+5:302020-01-21T11:45:48+5:30

देवगड तालुक्यातील कसबा वाघोटण येथे वाघोटण खाडीत खेकडे पकडण्यासाठी जाणाऱ्या १५ वर्षीय हर्षद घाडी या मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली.

Lightning strikes, death of child, incident at Kasba Wagotan | विजेचा धक्का बसून मुलाचा मृत्यू, कसबा वाघोटण येथील घटना

विजेचा धक्का बसून मुलाचा मृत्यू, कसबा वाघोटण येथील घटना

Next
ठळक मुद्देविजेचा धक्का बसून मुलाचा मृत्यूकसबा वाघोटण येथील घटना

देवगड : देवगड तालुक्यातील कसबा वाघोटण येथे वाघोटण खाडीत खेकडे पकडण्यासाठी जाणाऱ्या १५ वर्षीय हर्षद घाडी या मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा वाघोटण येथील हमीद अली बोरकर (७०) यांचा आपल्या घराच्या मागील बाजूला चिकन विक्रीचा व्यवसाय आहे. वाघोटण येथील हर्षद प्रभाकर घाडी हा नेहमीप्रमाणे वाघोटण खाडी येथे खेकडे पकडण्यासाठी लागणारे कोंबडीचे आतडे आणण्यासाठी दुपारी चिकन सेंटरकडे गेला होता. बोरकर यांनी आपल्या कोंबड्यांची चोरी होत असल्याने कोंबड्यांच्या खुराड्याला (लोखंडी जाळीच्या पिंजऱ्याला) विद्युत प्रवाह जोडला होता.

हर्षद हा दुपारी कोंबडीचे आतडे आणण्यासाठी तेथे गेला असता त्याचा अचानक तोल गेल्याने कोंबडीच्या लोखंडी पिंजऱ्यावर तो पडला. यावेळी त्याला विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच वाघोटण सरपंच कृष्णा आमलोसकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. या घटनेची माहिती हर्षदचे वडील प्रभाकर गणपत घाडी यांनी विजयदुर्ग पोलीस स्थानकात दिली.

घटनेची माहिती मिळताच विजयदुर्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोळी, हवालदार राजन जाधव, सुदेश तांबे, किरण कदम, कांबळे, जाधव यांनी घटनास्थळी जाऊन रितसर पंचनामा केला. मात्र उशिरापर्यंत विजयदुर्ग पोलीस स्थानकात नोंद झाली नव्हती.

Web Title: Lightning strikes, death of child, incident at Kasba Wagotan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.