राजापूर/कणकवली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाचे समर्थन केले आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा सरकार फेरविचार करणार असून या प्रकल्पामुळे १ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाणावरून निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत.या प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे तो थांबवण्यात आला होता. पण येथे आल्यावर तुमचा उत्साह पाहिल्यानंतर या प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा करावी असे मला वाटते. आज या प्रकल्पाबात कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी या संदर्भात तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे, असेही त्यांनी राजापूर येथे महाजनादेश यात्रेत सांगितले. समृद्ध कोकण घडविण्यासाठी जनादेश द्या, असे आवाहन त्यांनी कणकवली विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर महाजनादेश यात्रेच्या सभेत व्यक्त केला.राणेंबाबत चकारही नाहीसंपूर्ण यात्रेदरम्यान महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत एक चकार शब्द त्यांनी काढला नाही़>ंपर्यावरणाची हानी करून प्रकल्प नको - आदित्यआमचा कोणत्याही प्रकल्पाला विरोध नाही; पण प्रकल्पांमुळे पर्यावरणाची हानी होऊ नये आणि असे प्रकल्प राबविताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे, असे सांगत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर दिले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी ठाण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.
Vidhan Sabha 2019 : नाणार प्रकल्पाचा फेरविचार करणार- मुख्यमंत्र्यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 4:44 AM