शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

मालवणच्या वैद्यकीय अधीक्षकांवर दगडाने हल्ला

By admin | Published: May 25, 2015 11:39 PM

आपणास शिवीगाळ केल्याबाबत डॉ. पांचाळ यांनी मालवण पोलिसात दिलेल्या पहिल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला

मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पांचाळ यांच्यावर रुग्णालयातीलच शिपाई भास्कर साळुंखे याने दगडाने हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री १०.३० वाजता मालवण ग्रामीण रुग्णालयात घडली. साळुंखे याने मारलेला दगड डॉ. पांचाळ यांच्या हातावरील ब्रेसलेटवर बसल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.रविवारी रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास डॉ. सुरेश पांचाळ हे रुग्णालयात जनरल रुममध्ये रुग्णाची तपासणी करीत असताना मद्यधुंद अवस्थेत असलेला शिपाई भास्कर साळुंखे हा त्याठिकाणी आला. त्याने रुग्णांच्या समक्षच डॉ. पांचाळ यांना शिवीगाळ केली. साळुंखे याला रुमबाहेर जाण्यास सांगून डॉ. पांचाळ यांनी या प्रकाराबाबत तत्काळ मालवण पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसात तक्रार करूनही साळुंखे हा थोड्या वेळाने १०.३० वाजता पुन्हा त्याठिकाणी आला व त्याने डॉ. पांचाळ यांच्यावर दगड मारला. मात्र दगडाचा हल्ला चुकविण्यासाठी डॉ. पांचाळ यांनी मध्ये हात धरल्याने दगड त्यांच्या हातातील ब्रेसलेटवर बसला. यानंतर साळुंखे याने तेथून पळ काढला. आपणास शिवीगाळ केल्याबाबत डॉ. पांचाळ यांनी मालवण पोलिसात दिलेल्या पहिल्या तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र साळुंखे याने दगडाने हल्ला केल्याची तक्रार देण्यास गेलो असता पोलीस आपली तक्रार घेत नाही असे डॉ. पांचाळ यांनी सांगितले. तर मालवण पोलिसांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली जाईल असे सांगितले.दरम्यान, मालवण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी डॉ. पितळे, डॉ. चव्हाण यांनाही अशा प्रकारच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले होते. तसेच डॉ. सुरेश पांचाळ यांच्यावर हा दुसऱ्यांदा हल्ला झाला असून अशाप्रकारच्या हल्ल्यांमुळे वैद्यकीय क्षेत्रात मालवण ग्रामीण रुग्णालयाची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत चालली आहे. (प्रतिनिधी)