सिंधुदुर्गनगरी : एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणातून कणकवली येथील कृष्णा उर्फ बंड्या नाईक, रमेश पावसकर, वैभव मालंडकर, स्वप्नील पाटील आणि मयूर चव्हाण या पाचही जणांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.तक्रारदार व तिची मुलगी ही कणकवली तालुक्यातील एका गावात ज्या खोलीत भाड्याने राहत होती ती खोली खाली करण्यास मालकाने सांगितल्याने १५ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ८ वाजता तक्रारदार आणि तिचा मित्र कणकवली शहरात भाड्याने खोली पाहण्यास फिरत होते. ते कणकवली एसटी स्टँड येथे आले असता तक्रारदाराच्या मोबाईलवर कृष्णा उर्फ बंड्या नाईक (४०, रा. बिजलीनगर, कणकवली) याचा फोन आला आणि तुमची काय अडचण आहे असे त्यांना विचारले. यावेळी त्यांनी आपली आई आजारी असून आपल्याला पाच हजार रुपयांची गरज आहे असे सांगितले. यावर कृष्णा याने पैसे देण्यास आपण तयार आहोत, पण आपल्यासोबत यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर रमेश विष्णू पावसकर (३६, रा. कलमठ बाजारपेठ) याने आपल्या दुचाकीवरून तक्रारदार हिला शहरातील हॉटेलमागे एका घरामध्ये घेऊन गेला आणि संशयित आरोपी कृष्णा व रमेश यांनी तक्रारदारावर बलात्कार केला.त्यानंतर १८ नोव्हेंबर २०१५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार व तिचा मित्र साक्षीदार हे जेवण करून चालत असताना वैभव चंद्रकांत मालंडकर (२८, रा. कांबळेगल्ली कणकवली), स्वप्नील सुभाष पाटील (३२, रा. परबवाडी, कणकवली) आणि मयूर विश्वनाथ चव्हाण (३१, रा. बाजारपेठ, कणकवली) या तिघांनी चारचाकी गाडी घेऊन तक्रारदार व साक्षीदार यांना या गाडीमध्ये जबरदस्तीने बसविले आणि बराच वेळ शहरात फिरविले.त्यानंतर मुडेडोंगरी येथे नेऊन तक्रारदार महिलेवर बलात्कार केला व कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार त्याच रात्री तक्रारदार महिलेने कणकवली पोलीस स्थानकात दिली होती.चौदा साक्षीदार तपासलेया तक्रारीनुसार पोलिसांनी पाचही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून या पाचही जणांना रात्रीच ताब्यात घेतले होते. या पाचही जणांना प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी होऊन हे सध्या जामिनावर मुक्त होते. या प्रकरणाची सुनावणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात पार पडली. यामध्ये एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र साक्षीदारांच्या साक्षीमधील तफावत तसेच ठोस वैद्यकीय पुरावा नसणे आदींमध्ये या पाचही जणांना संशयाचा फायदा देत न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. याप्रकरणी संशयितांच्यावतीने वकील संग्राम देसाई, उमेश सावंत, अश्पाक शेख, सुहास साटम यांनी काम पाहिले.
महिलेवर सामूहिक अत्याचार : सबळ पुराव्याअभावी पाचजण निर्दोष मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 7:27 PM
एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणातून कणकवली येथील कृष्णा उर्फ बंड्या नाईक, रमेश पावसकर, वैभव मालंडकर, स्वप्नील पाटील आणि मयूर चव्हाण या पाचही जणांना येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.
ठळक मुद्देमहिलेवर सामूहिक अत्याचार : पाचजण निर्दोष मुक्तकणकवली तालुक्यातील प्रकरण