संदीप बोडवे मालवण: मालदीव वादानंतर क्रिकेट जगतातील दिगज्ज सचिन तेंडुलकरने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सिंधुदुर्गातील आठवणींना उजाळा देत पर्यटनासाठीसिंधुदुर्गासह भारतातील सुंदर किनारे आणि समुद्री बेटांकडे वळण्याचे लोकांना आवाहन केले आहे. सचिनने म्हटले आहे की अतिथी देवो भव हे भारतीयांचे तत्वज्ञान आहे. सचिन बरोबरच बॉलीवूड स्टार अक्षय कुमार, सलमान खान, जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर आदी सेलिब्रेटींनी लक्षद्वीप, अंदमान आणि सिंधुदुर्ग सारख्या भारतीय समुद्री बेटांकडे वळण्याचे लोकांना आवाहन केले आहे. आठवणींना उजाळासचिनने काहीं महिन्यांपूर्वी आपला ५० वा वाढदिवस आपल्या परीवारासमवेत सिंधुदुर्गातील निवती - भोगवे या किनाऱ्यावर साजरा केला होता. या आठवणींना उजाळा देताना सचिनने, सिंधुदुर्गात निवती - भोगवे बीच वरील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. काय म्हणाला सचिन..?
- सचिनने एक्स वर म्हटले आहे की, भारतात सुंदर बीच आणि समुद्रातील आयलंड आहेत. काही महिनापूर्वी माझा ५० वा वाढदिवस सिंधुदुर्गात साजरा झाला.
- किनारपट्टीवरील या गावाने आम्हाला हवे असलेले बरेच काही दिले. अप्रतिम आदरातिथ्यांसह आम्हीं इथून आठवणींचा खजिना घेऊन गेलो आहोत.
- भारताला सुंदर किनारपट्टी आणि समुद्रातील स्थानीय बेटांचे वरदान आहे. भारतीयांच्या अतिथी देवो भव" या तत्वज्ञान बरोबरच, आमच्याकडे शोधण्यासारखे बरेच काही आहे, कितीतरी आठवणी निर्माण होण्याची वाट पाहत आहेत.