कुडाळ चेंदवण मधील महिला पुरात बेपत्ता, शोधकार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 06:58 PM2019-08-06T18:58:45+5:302019-08-06T18:59:32+5:30
मंगळवारी पहाटे पासून बेपत्ता असलेल्या चेंदवण मळावाडी येथील महीला मळावाडी येथील घरात आलेल्या पुराच्या पाण्यात मंगळवारी पहाटे वाहुन गेल्याची प्राथमिक माहिती...
कुडाळ - मंगळवारी पहाटे पासुन बेपत्ता असलेल्या चेंदवण मळावाडी येथील भाग्यश्री पिळणकर (वय- 49) ही महीला मळावाडी येथील घरात आलेल्या पुराच्या पाण्यात मंगळवारी पहाटे वाहुन गेल्याची प्राथमिक माहीती निवती पोलिस प्रशासनाकडुन मिळत असुन निवती पोलिस व ग्रामस्थ तिचा शोध घेत आहेत मात्र ती सापडुन आली नाही.
या बाबत कुडाळ तहसिल कार्यालय व निवती पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कर्ली नदीला आलेल्या पुरामुंळे चेंदवण मळावाडी येथील अनेक घरात पाणी घुसले आहे. पिळणकर कुटुंबिय पहाटे पाणी घरात आले असता जागे झाले. मात्र त्यांनी भाग्यश्री पिळणकर या दिसुन आल्या नाहीत. त्यांचा इतरत्र शोध घेण्यात आला मात्र त्या सापडुन आल्या नाहीत. त्यामुंळे या बाबत तिच्या पतीने निवती पोलिस ठाण्याला माहीती दिली. या ठिकाणी पुर आल्या असल्याने आपत्ती कक्ष कुडाळला ही त्याची माहीती देण्यात आली. प्राथमिक तपासात ती पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान निवती पोलिस, ग्रामस्थ व आपत्ती व्यवस्थापन त्या महीलेचा गिवसभर शोध घेत होते. मात्र ती सापडुन आली नाही.
चेंदवण येथे कुडाळ प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी, निवती पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे, सरपंच सौ उत्तरा धुरी, शिवसेनेचे अतुल बंगे इतर अधिकारी, लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थ येथील पुरग्रस्तानां सहकार्य करीत असून पुरामुळे अडकलेल्या ग्रामस्थांना त्यांच्या संपूर्ण सामानासहीत सुखरूपपणे आपत्कालीन व्यवस्थापन बाहेर आणत असून पाण्यातील होडीला लावण्याची इंजीन कमी पडत असल्याने चांदा ते बांदा योजनेतून मिळालेली कोचरा श्रीराम वाडी येथील आबा केळुस्कर यांना घेऊन पाचारण करण्यात आले.