सावंतवाडी : चार दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाल्यानंतर मला एका समर्थका कडून धमकीचा फोन आला होता. तो नंबर माझ्याकडे असून अद्याप पर्यंत पोलिसांत याची तक्रार दिली नाही, पण फोन वरून आणखी काय जर बोलला असता तर पोलिसांकडे तक्रार केली असती असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला.जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धमकीचा फोन आल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.आमदार केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा दहशतीने डोके वर काढले आहे. जिल्हा बँक निवडणूक ही शेतकऱ्याची बँक असून ती कोणाच्या तरी हातात देऊन आपणास काय साध्य करायचे आहे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आपणास हा दहशतवाद संपवायचा आहे. मी चार दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेतली होती ही यानंतर मला धमकीचा फोन आला होता असेही त्यांनी सांगितले.म्याव म्याव वाल्यांनी जेलमधील वडापाव आठवावा विधानसभा परिसराचे सर्व सदस्यांनी पावित्र्य जपले पाहिजे. वाघापुढे मांजर म्याव म्याव करणारच. पण म्याव म्याव करणाऱ्यांनी जेलमधील वडापाव खाल्ला हे विसरू नये असाही टोलाही केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.
आमदार दीपक केसरकरांना धमकीचा फोन, केसरकरांनी स्वत: दिली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 5:21 PM