कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरामध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.निकाल काही लागला तरी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस सतर्क असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये कणकवली शहरात इतर तालुक्यातील पोलीस अधिकारी व कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस कर्मचारी मागवले असल्याचे दिसत आहे.जिल्हा बँक निवडणुकीची रणधुमाळी दरम्यान १८ डिसेंबर रोजी कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेण्या हल्ला झाला होता. या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणी अटक होऊ नये म्हणून राणे पसार झाले होते.जिल्हा न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. आज यावर सुनावणी होणार आहे. यासर्व प्रकरणानंत नॉट रिचेबल असलेले आमदार राणे जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीवेळी १८ दिवसांनी अचानक समोर आले होते.
आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 12:03 PM