मुंबईतील पर्यटकाचा मालवणमध्ये बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:20 AM2020-01-06T05:20:31+5:302020-01-06T05:20:38+5:30
मालवण : मालवण दांडी समुद्रात आपल्या पत्नीसोबत पॅरासिलिंगला गेलेल्या मुंबईतील तरुण पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. अझर मनझर अन्सारी (३५, ...
मालवण : मालवण दांडी समुद्रात आपल्या पत्नीसोबत पॅरासिलिंगला गेलेल्या मुंबईतील तरुण पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. अझर मनझर अन्सारी (३५, रा. साकीनाका मुंबई) असे या पर्यटकाचे नाव आहे. अझर याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मुंबई साकिनाका येथून अझर अन्सारी व हिनाबी अन्सारी हे दाम्पत्य ३ जानेवारीला गोवा येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारी साडेतीन वाजता मालवण दांडी बीच येथून अन्सारी दाम्पत्य नौकेतून पॅरासिलिंगसाठी समुद्रात गेले. नौकेत आणखीही पर्यटक होते. सर्वांनी लाईफ जॅकेट घातली होती. अझर यांनी लाईफ जॅकेट काढून ठेवले व नौकेच्या टोकावरील प्लॅटफॉर्मवर बसले. काही वेळातच नौकेत आरडाओरडा सुरू झाली. यावेळी मला माझे पती समुद्रात पडल्याचे समजले, असे हिनाबी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.