कणकवली : कणकवली महाविद्यालय क्लस्टरच्या अंतर्गत महाविद्यालयांचे प्राचार्य व परीक्षा विभागप्रमुख यांची सभा कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात झाली.सभेला सर्व महाविद्यालयातील प्राचार्य व परीक्षा विभागप्रमुख उपस्थित होते. या सभेत सर्वानुमते द्वितीय व तृतीय वर्ष सेमिस्टर व सेमिस्टर तीनच्या कला, वाणिज्य व विज्ञान वर्गाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व महाविद्यालयांनी घ्याव्यात तसेच सेमिस्टर एक प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गाच्या परीक्षा ९ जानेवारी २०२१ पर्यंत घ्याव्यात असे ठरविण्यात आले.
मुंबई विद्यापीठाने परीक्षांबाबत निर्देश दिले असून त्याप्रमाणे परीक्षांच्या तारखा व नियोजन करण्याबाबत कणकवली महाविद्यालयात प्राचार्य व परीक्षा विभागप्रमुखांची सहविचार सभा आयोजित केली होती.या सभेच्या अध्यक्षस्थानी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे उपस्थित होते. या सभेत कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले यांनी परीक्षेच्या नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी अनेक महाविद्यालयातील प्राध्यापकांनी चर्चेत सहभाग घेतला व सूचना केल्या. या सभेसाठी देवगड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुखदा जांभळे , फोंडाघाट कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कामत, डॉ. आशिष नाईक, प्रा. वासिम सय्यद यांनीही मार्गदर्शन केले.विद्यापीठाच्या निर्देशानुसार यावेळी सर्व वर्गांची परीक्षा ६० गुणांची असून ४० बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने या परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना सरावासाठी सर्व विषय प्राध्यापकांनी नमुना प्रश्नपत्रिका द्याव्यात व आपापल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा सराव घ्यावा, असेही ठरविण्यात आले.