आंबोली (सिंधुदुर्ग) : आंबोली कामतवाडीतील यशवंत उर्फ रूपा नाना गावडे (४६) याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी येथील गावठण येथील अर्जुन न्हानू राऊत, न्हानू राऊत, संजय बिडकर, युवराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंबोली ग्रामपंचायत येथे रूपा गावडे यांच्या दुचाकी आणि अर्जुन राऊत याची झेन गाडीचा अपघात झाला. त्यानंतर पुढे हिरण्यकेशी फाटा येथे बाचाबाची झाली. यात रूपा गावडे यांच्यावर हातावर पाळ कोयता तसेच पायावर वार करण्यात आला तसेच रॉड मारण्यात आला. खुनी हल्ला करून गळ्यातील चैन गहाळ झाली तसेच मोबाईल फोडून टाकण्यात आला. यानंतर त्यांना १०८ ने आरोग्य केंद्रात आणण्यात आले. त्याठिकाणी डॉ.महेश जाधव यांनी उपचार केले. तसेच डॉ.प्रतीक्षा मुंडे यांनी अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने सावंतवाडी येथे नेण्यात आले. डॉ.जाधव यांनी हात फॅक्चर तसेच धारदार आणि बोथट हत्याराने जखम असल्याचे सांगितले. आंबोली पोलिस हवालदार दीपक शिंदे आणि पोलीस नाईक मनेश शिंदे यांनी आंबोली आरोग्य केंद्रात जाऊन जबाब आणि तक्रार नोंद करून गुन्हा दाखल केला आहे.यात धारदार शस्त्राने हल्ला दुखापत करणे, जागेत जाऊन मारामारी करणे, अपघात , नुकसान ,शिवीगाळ,सामायिक उद्देशाने मारहाण या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान आंबोली पोलिस स्थानकात अर्जुन राऊत यांनी देखील उलट तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मेडिकल करण्यात आले असून तक्रारीनुसार दोन्ही बाजूनी गुन्हा नोंद करून पोलिस पुढील प्रक्रिया करणार आहेत.अशी माहिती हवालदार दीपक शिंदे यांनी दिली.