नांदगाव-कोळंबा देवाचे लाईव्ह दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 04:54 PM2020-05-05T16:54:40+5:302020-05-05T16:55:33+5:30
या जैविक विषाणूच्या महामारीत अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कामगार, पॅरामेडिकल स्टाफ, सर्व पोलीस यंत्रणा, वीज कर्मचारी, राज्य प्रशासन यंत्रणा आणि सीमेवरील सैनिक यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
तळेरे : भक्तांच्या हाकेला धावणारा, नवसाला पावणारा असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील जागृत देवस्थान श्री कोळंबा देवाची जत्रा सालाबादप्रमाणे रविवार १७ मे रोजी होणार आहे. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदीचा आदेश शासनाने दिला आहे.
या पार्श्वभूमीमुळे श्री कोळंबा देवाची जत्रा जाहीररित्या साजरी करणे शक्य होणार नाही. मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवणे शक्य होणार नाही. म्हणून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव कोळंबा देवाचे लाईव्ह दर्शन सर्व भक्त मंडळींना घरबसल्या मिळावे यादृष्टीने श्री देव कोळंबा देवस्थान उत्सव समिती नांदगावने श्री कोळंबा देवाच्या दर्शनाची आॅनलाईन व्यवस्था करण्यात येणार आहे. १९८४ पासून प्रथमच ही जत्रा जाहीररित्या होत नाही.
तरी सर्व भक्तमंडळींनी घरी बसून दर्शनाचा लाभ घ्यावा व श्री कोळंबा देवाचे आशीर्वाद घ्यावेत. आपण सर्वांनी घरी बसूनच या कोरोनारुपी महामारीच्या जागतिक संकटातून तू सर्वांची लवकरच मुक्तता कर अशी श्री कोळंबा देवा चरणी प्रार्थना करुया.
या जैविक विषाणूच्या महामारीत अहोरात्र सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, सफाई कामगार, पॅरामेडिकल स्टाफ, सर्व पोलीस यंत्रणा, वीज कर्मचारी, राज्य प्रशासन यंत्रणा आणि सीमेवरील सैनिक यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. तरी यावर्षी श्री देव कोळंबाचे दर्शन आॅनलाईन घ्यावे, असे आवाहन श्री देव कोळंबा देवस्थान उत्सव समिती, नांदगावच्यावतीने अध्यक्ष नागेश मोरये व उत्सव समिती यांनी केले आहे.
कोळंबा देव