शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

युवा पिढीला निसर्गाकडे वळविण्याची गरज : रामेश्वर सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 5:47 PM

forest, sindhudurgnews सोशल मीडिया, सवंग करमणूक यांच्या आहारी गेलेल्या, काहीशा दिशाहीन झालेल्या युवा पिढीला खऱ्याखुऱ्या आनंदी, निरोगी जीवनाचे दर्शन घडवायचे असेल तर त्यांना पुन्हा निसर्गाकडे वळविले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक आणि सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष रामेश्वर सावंत यांनी भैरवगड (ता. कणकवली) येथे केले.

ठळक मुद्देयुवा पिढीला निसर्गाकडे वळविण्याची गरज : रामेश्वर सावंत ३२ जणांचा सहभाग : भैरवगड मोहिमेचे यशस्वी आयोजन

सिंधुदुर्गनगरी : सोशल मीडिया, सवंग करमणूक यांच्या आहारी गेलेल्या, काहीशा दिशाहीन झालेल्या युवा पिढीला खऱ्याखुऱ्या आनंदी, निरोगी जीवनाचे दर्शन घडवायचे असेल तर त्यांना पुन्हा निसर्गाकडे वळविले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक आणि सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबचे अध्यक्ष रामेश्वर सावंत यांनी भैरवगड (ता. कणकवली) येथे केले.सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबने भैरवगड या वनदुर्गावर दोन दिवसांची दुर्गभ्रमण मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेत ३२ दुर्गप्रेमी सहभागी झाले होते. यात ज्येष्ठ गिर्यारोहक निनाद खोत, ह्यघुंगुरकाठी-सिंधुदुर्गह्ण संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, कवयित्री डॉ. सई लळीत, पर्यावरण तज्ज्ञ श्रीधर पेडणेकर, उभयचर प्राणी तज्ज्ञ गुरु कदम, अक्षय दळवी, पक्षी तज्ज्ञ प्रवीण सावंत, प्रथमेश माळकर, मोहीम नेता प्रतीक गुरव, हेमंत परब, चित्रकार अक्षय मेस्त्री आणि अन्य दुर्गप्रेमी सहभागी होते. यात दहा महिलांचा समावेश होता.या मोहिमेच्या समारोपप्रसंगी भैरवगडावरील भैरव मंदिराच्या प्रांगणात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी सतीश लळीत यांनी मोहिमेच्या यशस्वी आयोजनाबद्दल रामेश्वर सावंत यांचा शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार केला. या मोहिमेचे सर्व व्यवस्थापन कौशल्याने सांभाळणारे युवक प्रतीक गुरव व हेमंत परब यांचा सत्कार सावंत यांनी केला.सावंत पुढे म्हणाले, आजकालचे जीवन अतिशय धावपळीचे झाले आहे. तेवढेच ते कृत्रिम झाले आहे. माणूस निसर्गापासून दूर जात आहे. पर्यावरणाची आणि निसर्गाची हानी होत आहे. युवकांमध्ये निसर्ग, पर्यावरण, साहसी खेळ यांची आवड निर्माण करण्यासाठी सिंधु-सह्याद्री ॲडव्हेंचर क्लबने ही दुर्गमोहीम आयोजित केली होती.

यावेळी सतीश लळीत म्हणाले, कोरोनाच्या साथीमुळे व सततच्या टाळेबंदीमुळे कोंडलेपणा आला होता. आता प्रशासनाने नियम पाळून भ्रमंतीला परवानगी दिली आहे. या दुर्गभ्रमण मोहिमेमुळे सर्वच सहभागींना निसर्गाच्या अगदी जवळ जाण्याची संधी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.ऐतिहासिक घटनांची केली उजळणीभ्रमंतीच्या पहिल्या दिवशी गडावरील नागणीचे पाणी या ठिकाणी ट्रेक व पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेथे प्रवीण सावंत यांनी सह्याद्रीमधील जैवविविधतेची माहिती दिली. रात्री शेकोटीच्या कार्यक्रमात देशभक्तीपर गाणी, कविता, ऐतिहासिक घटनांची उजळणी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी गडावर स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. लवकरच पुढील मोहीम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :forestजंगलsindhudurgसिंधुदुर्ग