OBC reservation: 'ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिंमत दाखवा!'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:44 PM2022-05-20T14:44:36+5:302022-05-20T14:47:00+5:30

सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी

OBC ministers should dare to resign to get political reservation for OBCs, Appeal of BJP Sindhudurg District President Rajan Teli | OBC reservation: 'ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिंमत दाखवा!'

OBC reservation: 'ओबीसी मंत्र्यांनो आता तरी लाचारी सोडा, समाजासाठी हिंमत दाखवा!'

googlenewsNext

कणकवली : महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण महाराष्ट्र राज्याने गमावले आहे. तसेच ते पुन्हा मिळत नाही. त्यामुळे सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ओबीसींना राजकीय आरक्षण देताना ते किती प्रमाणात द्यावे, हा प्रश्न आहे. त्यासाठी समर्पित आयोगामार्फत इम्पिरिकल डेटा अर्थात ओबीसींची वस्तुस्थितीनुसार आकडेवारी गोळा करून प्रमाण ठरवणे आणि एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय ते पुन्हा लागू करण्यासाठी ही तिहेरी चाचणी पूर्ण करण्यास सांगितले होते.

महाविकास आघाडी सरकारने नेमके हेच काम केले नसल्याने राज्यातील ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा लागू होत नाही. दुसरीकडे मध्य प्रदेशने न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब डेटा गोळा करून चाचणी पूर्ण केली व ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवले. मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे.

या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी. इम्पिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण केली की ओबीसी राजकीय आरक्षण परत मिळणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या ४ मार्च २०२१ निकालापासूनच स्पष्ट होते. परंतु आता मध्य प्रदेशचा निकाल आल्यावर नवा शोध लागल्यासारखे या सरकारचे मंत्री महाराष्ट्रालाही आपोआप आरक्षण मिळेल, अशी दिशाभूल करत आहेत.

समाजासाठी हिंमत दाखवावी

महाविकास आघाडीने इम्पिरिकल डेटा गोळा करण्यात अक्षम्य टाळाटाळ केल्यामुळेच ओबीसींना परत आरक्षण मिळत नाही. या अपयशाची जबाबदारी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांचीही आहे. त्यामुळेच त्यांनी आता तरी समाजासाठी हिंमत दाखवावी व मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्राने तिहेरी चाचणी पूर्ण करून आरक्षण परत मिळविण्यासाठी मंत्रिपदाचे राजीनामे देऊन सरकारवर दबाव आणावा, असेही तेली यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: OBC ministers should dare to resign to get political reservation for OBCs, Appeal of BJP Sindhudurg District President Rajan Teli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.