संघटीतपणे पक्ष वाढवा

By admin | Published: January 11, 2016 11:03 PM2016-01-11T23:03:17+5:302016-01-12T00:37:58+5:30

चित्रा वाघ : दोडामार्गच्या राष्ट्रवादी मेळाव्यात महिलांना मार्गदर्शन

Organize the party jointly | संघटीतपणे पक्ष वाढवा

संघटीतपणे पक्ष वाढवा

Next

कसई दोडामार्ग : भाकरी भाजता भाजता पाण्याची दोर तुमच्या हाती दिली. सत्तेच्या चाव्या तुमच्या हातात दिल्या. जी बाई घर चालवू शकते, ती बाई आता सत्ता चालवू शकते, असा विचार करणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. या पक्षाचे नेते शरद पवार आहेत. महिलांना ५० टक्के आरक्षण दिले. त्यामुळे तुम्ही गावोगावी जाऊन पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दोडामार्ग येथे आयोजित महिला मेळाव्यात केले.
दोडामार्ग महिला राष्ट्रवादी काँगे्रसच्यावतीने येथील महाराजा हॉलमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर सुरेश दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, युवती अध्यक्ष रंजिता वेंगुर्लेकर, पूजा कर्पे, रेखा कदम, सुचिता दळवी, उपनगराध्यक्षा साक्षी कोरगावकर, तालुकाध्यक्ष अदिती मणेरीकर, मनीषा गवस, अ‍ॅड. रेवती राणे, शोभा कोळेकर, गोपाळ गवस, महादेव बोर्डेकर आदी उपस्थित होते.
चित्रा वाघ म्हणाल्या, कॉग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार असताना विकास झाला. शरद पवार यांच्यामुळेच महिलांना ३३ टक्के आरक्षणावरून ५० टक्के आरक्षण मिळाले. हा ऐतिहासिक निर्णय झाला. शेतकऱ्यांना कर्ज माफ केले. आताचे सरकार ते करू शकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांबद्दल किती त्यांना आस्था आहे, हे समजते. महिलांनी संघटीत होऊन पक्षाची ताकद वाढविणे आवश्यक आहे. आपला हक्क, न्याय यासाठी प्रत्येक महिलेने पुढे येणे आवश्यक आहे. तालुक्याच्या ठिकाणी बसून न राहता लोकांपर्यंत पोहचा. त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या समजून घ्या आणि काम करा. आज स्त्रीवर अत्याचार होतात. त्यावेळी स्त्री आवाज उठवत नाही.
आज रेशन दुकानात धान्य खराब मिळते. त्याविरोधात आवाज उठवा. सार्वजनिक ठिकाणी शौचालये नाहीत. शाळा, कॉलेजमध्ये पन्नास विद्यार्थ्यांच्या मागे एक शौचालय आवश्यक आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन आहे, असे सरकार सांगते. प्रत्यक्ष मात्र अशा सोयी नाहीत. याविरूध्द आवाज उठवा. मकरसंक्रांत असल्यामुळे तिळगुळ सुरक्षा हा कार्यक्रम राबवा. ज्याठिकाणी महिला एकत्र येणार त्याठिकाणी तुमचा संपर्क वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. (वार्ताहर)

अन्यायाविरुध्द आवाज उठवा : संपर्क वाढवा
रेशन दुकानात धान्य खराब मिळते. त्याविरोधात आवाज उठवा. सार्वजनिक ठिकाणी शौचालये नाहीत. शाळा, कॉलेजमध्ये पन्नास विद्यार्थ्यांमागे एक शौचालय असणे आवश्यक आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन आहे, असे सरकार सांगते. प्रत्यक्ष मात्र अशा सोयी नाहीत. याविरूध्द आवाज उठवा. मकरसंक्रांत असल्यामुळे ‘तिळगुळ सुरक्षा’ हा कार्यक्रम राबवा. ज्याठिकाणी महिला एकत्र येणार त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Organize the party jointly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.