भातशेती पुराच्या पाण्याखाली, पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:37 PM2020-10-17T17:37:52+5:302020-10-17T17:40:02+5:30

rain, Farmer, sindhudurgnews गेले ४ ते ५ दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी शुकनदीला आलेल्या पुरामुळे येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीत पुराचे पाणी गेल्यामुळे हातातोंडाशीआलेल्या उभ्या भातशेतीचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

Paddy cultivation under flood waters, continuous rains | भातशेती पुराच्या पाण्याखाली, पावसाची संततधार

भातशेती पुराच्या पाण्याखाली, पावसाची संततधार

Next
ठळक मुद्दे भातशेती पुराच्या पाण्याखाली, पावसाची संततधार खारेपाटण शुकनदीला पूर, भातपिकाचे नुकसान

खारेपाटण : गेले ४ ते ५ दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी शुकनदीला आलेल्या पुरामुळे येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीत पुराचे पाणी गेल्यामुळे हातातोंडाशीआलेल्या उभ्या भातशेतीचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.

विजयदुर्ग खाडीला आलेल्या पुराचा फटका शुकनदीच्या पात्रामुळे खाडीकाठच्या किनारी लागून असणाऱ्या गावातील भातशेतीला बसला आहे. खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराच्या पाण्यामुळे खारेपाटण बंदरगावाकडे जाणारा रस्ता पूर्णत: पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती. तर खारेपाटण चिंचवली हा रस्तादेखील पाण्याखाली गेल्यामुळे या गावाचा संपर्क तुटला होता.

खारेपाटण येथे दुपारी १२ नंतर पुराचे पाणी भरायला सुरुवात झाली. खारेपाटण येथील शेतकरी बांधवांचे पिकलेले भातपीक अक्षरश: पुराच्या पाण्यात बुडालेले दिसत होती. पुराचे पाणी असेच राहिल्यास भातपीक कुजून जाण्याची शक्यता आहे.

शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने तातडीने येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीच्या नुकसानीची पंचयादी घालून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.


 

Web Title: Paddy cultivation under flood waters, continuous rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.