पारकरांची भूमिका हीच शिवसेनेसह जनतेची भूमिका : शैलेश भोगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 04:31 PM2020-09-25T16:31:36+5:302020-09-25T16:34:21+5:30

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरवासीयांनी पुकारलेला जनता कर्फ्यू जनतेच्या सहभागामुळे आणि शिवसेनेच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे यशस्वी होत आहे. कर्फ्यू संदर्भात आमचे नेते संदेश पारकर यांनी घेतलेली जनहिताची भूमिका हीच शिवसेनेची भूमिका आहे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी मांडले आहे.

Parkar's role is the role of the people including Shiv Sena: Shailesh Bhogle | पारकरांची भूमिका हीच शिवसेनेसह जनतेची भूमिका : शैलेश भोगले

पारकरांची भूमिका हीच शिवसेनेसह जनतेची भूमिका : शैलेश भोगले

Next
ठळक मुद्देपारकरांची भूमिका हीच शिवसेनेसह जनतेची भूमिका : शैलेश भोगले राजकारणाचा नाही तर लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न

कणकवली : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरवासीयांनी पुकारलेला जनता कर्फ्यू जनतेच्या सहभागामुळे आणि शिवसेनेच्या सहकार्याच्या भूमिकेमुळे यशस्वी होत आहे. कर्फ्यू संदर्भात नेते संदेश पारकर यांनी घेतलेली जनहिताची भूमिका हीच शिवसेनेची भूमिका आहे, असे स्पष्ट मत शिवसेनेचे कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी मांडले आहे.

शैलेश भोगले म्हणाले, जनता कर्फ्यू हा जनतेने पुकारला असल्यास त्याचे स्वागत करण्याची भूमिका पारकर यांनी घेतली होती. कर्फ्यूच्या आडून प्रशासन किंवा नगरपंचायत दंडेलशाहीची भूमिका घेत असेल तर आपण रस्त्यावर उतरणार असल्याचे ते होते. ते योग्यच आहे.

सरसकट कर्फ्यू लागला असता तर औषधे, दूध, जीवनावश्यक वस्तू आदींचा तुटवडा झाला असता व नागरिकांचे जगणे खडतर झाले असते. पारकर यांच्या भूमिकेला प्रशासनानेही सहमती दर्शवली आणि जीवनावश्यक वस्तूंना कर्फ्यूतून वगळले, त्याबद्दल आम्ही प्रशासनाचे आभारी आहोत.

Web Title: Parkar's role is the role of the people including Shiv Sena: Shailesh Bhogle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.